
मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती 39 वर्षांची आहे. मुनमुनला NCBने 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता अटक केली. तिला 7 ऑक्टोबर पर्यंत अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशची असणारी मुनमुन धमेचा एका उद्योगपती परिवारामधून आहे. मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.

मुनमुन धमेचाच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले होते. तीचा भाऊ प्रिंन्स भमेचा सध्या दिल्लीमध्ये राहतो. मुनमुन धमेच्याने तिचे शालेय जीवन मध्य प्रदेशातील सागर येथे पूर्ण केले. त्यानंतर काही काळ ती तिच्या भावासोबत दिल्लीमध्ये राहत होती.

मुनमुन धमेचा सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर तीचे 10.3k फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती खूपच हॉट फोटो टाकत असते.

मुनमुन धमेचा अनेक कलाकारांसोबत पार्टी करताना दिसून येत आहे. या संबधीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. मुनमुन धमेचाने वरुण धवन, अर्जुन रामपाल, वीजे निखिल, गुरु रंधावा , सुयश राय यांसारख्या कलाकारांसोबत फोटो शेअर केले आहेत.

मुनमुन धमेचा आणि आर्यन खान याला एकाच पार्टीमध्ये अटक केले आहे. याआधी त्याच्या एकमेकांसोबत कोणताही फोटो नाही आहे. मुनमुन धमेचा आर्यन पेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे.