मी काही नॉस्ट्राडेमस नाही, तीन वर्षांचा इमर्जन्सी फंड तयार ठेवा, या तज्ज्ञाने व्यक्ती केली आर्थिक मंदीची भीती

जगात येणार आर्थिक मंदी ? तीन वर्षे पुरतील इतके पैसे साठवून ठेवण्याचा सल्ला चेन्नईतील प्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार मुथुकृष्णन दंडपाणी यांनी दिला आहे. २९ सप्टेंबर रोजी त्यांनी एक्स माध्यमावर पोस्ट टाकल्यानंतर समाजमाध्यमात यावर चर्चा सुरु झाली आहे.

| Updated on: Oct 07, 2026 | 7:55 PM
1 / 6
चेन्नई स्थित गुंतवणूक सल्लागार मुथुकृष्णन दंडपाणी यांनी २९ सप्टेंबर रोजी एक्सवर एक पोस्ट टाकल्यानंतर समाजमाध्यमात खळबळ उडाली आहे. त्यांनी मी काही येणाऱ्या आर्थिक संकटाचे भाकित केलेले नाही. त्याऐवजी गेल्या दोन वर्षांचे जागतिक संकट आणि अर्थव्यवस्था हे पाहून आपण कुटुंबांना पॅनिक न होता आपली आर्थिक स्थिती भक्कम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

2 / 6

मी काही नॉस्ट्राडेमस नाही,मी गेल्या दोन वर्षातील परिस्थिती पाहून सावध झालो आहे. कुटुंबानी तीन वर्षांचा इमर्जन्सी कॉपर्स फंड तयार करावा. कारण जागतिक मंदी आल्यास तुमची नोकरी राहिल याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे आतापासूनच तयारी करा असे गुंतवणूक सल्लागार मुथुकृष्णन दंडपाणी यांनी म्हटले आहे.

3 / 6

तीन वर्षांची तजवीज करा : आगामी कठीण काळाचा सामना करण्यासाठी पुढील तीन वर्षे पूर्ण कुटुंबाची गुजराण होऊ शकेल इतका आपत्कालीन निधी रोख किंवा सुरक्षित खात्यात जमा करावा असा सल्ला दंडपाणी यांनी दिला आहे.

4 / 6

कोणतेही नवीन कर्ज घेणे टाळा: सध्याच्या काळात कोणतेही नवीन कर्ज किंवा भविष्यातील उत्तरदायित्व वाढवणारी कोणतीही गोष्ट करू नका असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

5 / 6

मोठ्या खरेदीचा विचार पुढे ढकलावा - सध्या घर, जमीनजमुला किंवा कोणतीही मोठी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार काही काळ लांबणीवर टाकावा .

6 / 6

उत्पन्नाचा स्रोत जपा : नोकरी किंवा व्यवसायाच्या उत्पन्नाचे संरक्षण करावे. आणि कठीण काळात कामाच्या स्वरूपाबाबत किंवा पदाबाबत लवचिकता ठेवण्याचा सल्लाही गुंतवणूक सल्लागार मुथुकृष्णन दंडपाणी यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us