अभिमानास्पद! मराठ्यांचं शौर्य सांगणारी ती तलवार अखेर परतणार; मोठी अपडेट समोर

नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली.

| Updated on: Aug 11, 2025 | 6:40 PM
1 / 7

2 / 7
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 18 आँगस्टला ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे. रघुजी राजे भोसले यांनी वापरलेली आणि इतिहास घडविणारी तलवार मिळविण्यात सरकारला मोठं यश आलं आहे.

3 / 7
या तलवारीचा इंग्लंडमध्ये लिलाव करण्यात आला होता. मात्र वेळ फार कमी असतानासुद्धा महाराष्ट्र सरकारने तो लिलाव जिंकला होता. ही तलवार घेण्यासाठी नागपूरचे राजे रघुजी भोसले यांचे वंशज मुधोजी भोसले यांनीसुद्धा याचा पाठपुरावा केला होता. सरकारला यात हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली होती.

4 / 7
ही तलवार आता महाराष्ट्राच्या ताब्यात आल्यानंतर  मुधोजी राजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही तलवार परत आणण्यात यश आलं याचा मोठा आनंद नागपूरकरांना झाला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

5 / 7
तसेच ही ऐतिहासिक तलवार नागपुरात यावी आणि नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात यावी किंवा भोसले घराण्याच्या स्वाधीन करावी ही मागणीही त्यांनी केली आहे.

6 / 7
तलवार राज्यात येणार याचा जलोश सरकार तर करेलच पण भोसले घराणेसुद्धा मोठा जल्लोष करणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. ही तलवार महाराष्ट्रात परतल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

7 / 7
सरदार रघुजी भोसले यांची तलवार. ही तलवार आता महाराष्ट्रात येणार आहे.