धुराचे लोळ उठले, छताचा सांगाडा झाला आता फक्त राख…; नागपूर स्फोटाचे थरारक फोटो समोर

नागपूरच्या कळमेश्वर येथील सोलर इंडस्ट्रीज (SBL) कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत १६ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता प्रचंड असल्याने इमारत कोसळली आहे.

| Updated on: Mar 01, 2026 | 10:38 AM
1 / 8
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर औद्योगिक वसाहतीत असलेल्या SBL या स्फोटक तयार करणाऱ्या कारखान्यात आज पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर औद्योगिक वसाहतीत असलेल्या SBL या स्फोटक तयार करणाऱ्या कारखान्यात आज पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

2 / 8

तसेच या दुर्घटनेत २० ते ३५ हून अधिक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, कारखान्याची मुख्य इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. तसेच सध्या सर्वत्र इमारतीचा ढिगारा पडल्याचे दिसत आहे.

3 / 8

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजताची शिफ्ट सुरु असताना हा स्फोट झाला. या कारखान्यात डिटोनेटर बनवण्याचे काम सुरु होते. या स्फोटाच्या वेळी कारखान्यात सुमारे ३५ कर्मचारी कामावर होते. ज्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती.

4 / 8

मात्र अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, कारखाना जळून खाक झाला. तसेच या स्फोटाचे आवाज दूरपर्यंत ऐकू गेले. यासोबतच कारखान्याचे अवशेष अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत उडाले.

5 / 8

यामुळे ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

6 / 8

सध्या मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे. यासोबतच जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

7 / 8

या घटनेनंतर कंपनीच्या बाहेर नागरिक आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. कंपनी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांकडून केला जात आहे.

8 / 8

पोट भरण्यासाठी येथे आलेल्या कामगारांची सुरक्षितता कंपनीने घेणे गरजेचे होते, परंतु सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा संतप्त आरोप केला जात आहे. प्रशासनाने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us