
पुण्यातील शनिवारवाड्यात कथितपणे नमाज पठण करण्यात आल्याचा दवा केला जात आहे. हा दावा करताना एक व्हिडीओ शेअर केला जातोय. त्यामुळे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

भाजपाच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांनी हे प्रकरण लावून धरले असून शनिवारवाड्यात नमाज पठण करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर ही कथित घटना समोर आल्यानंतर शनिवार वाड्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दुसरीकडे नमाज पठणाचा कथित प्रकार समोर आल्यानंतर पुण्यातील पतीत पावन संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शनिवार वाड्याजवळ गोमुत्र शिंपडले.

तसेच या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोमुत्र शिंपडून तेथील जागा शेणाने सारवून घेतली आहे. सोबतच अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

शनिवार वाड्यात गोमुत्र शिंपडल्यानंतर तिथे शिववंदना सादर करण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणी नेमके काय होणार? असे विचारले जात आहे.