नांदेडमध्ये डबल मर्डर, दोन्ही महिलांचा गळा थेट…समोरचं दृश्य पाहून पोलीसही हादरले!

नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दुहेरी हत्याकांड घडले आहे. हत्या करण्यात आलेल्या दोन्ही महिलाच आहेत. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.

| Updated on: Nov 20, 2025 | 11:54 PM
1 / 5
नांदेड शहरात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरात एका सात वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाने अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. असे असतानाच आता आणखी एक मोठी आणि हादरवणारी घटना घडली आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार माहूर तालुक्यातील पाचुंदा गावात दुहेरी हत्याकांड घडले आहे. शेतात कापूस वेचणी करत असताना अंतकलाबाई अशोक आढागळे (वय 60) आणि अनुसयाबाई साहेबराव आढागळे (वय 45) या दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून खून करण्यात आला आहे.

3 / 5
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब आहे. त्यामुळेच ही घटना लुटमारीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून माहूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

4 / 5
या प्रकरणी माहूर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदेडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर विषय बनला आहे. येथे पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

5 / 5
पोलिसांनी या घटनेचा तपास चालू केला आहे. उपलब्ध पुराव्यांनुसार पोलीस आरोपीला शोधत आहेत. त्यामुळेच आता समोर आलेल्या या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रातिनिधीक फोटो)