
टोमॅटो पिकाला गेल्या काही दिवसांपासून बाजारात चांगले पैसे मिळत आहेत.

देशात अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटना घडल्या आहेत.

नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबट्यांची संख्या जास्त आहे.

टोमॅटो पिकाचे चोरट्यांपासून राखण करताना बिबट्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

टोमॅटो पीक चोरीपासून वाचण्याकरता अक्षरशः निफाड तालुक्यातील शेतकरी आपल्या टोमॅटोच्या क्षेत्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नजर ठेवत असल्याचे पाहायला मिळत आहे.