80 हजाराचे 8 लाख हवे, महिलेभोवती सावकारी विळखा, देहविक्रय व्यवसायात…नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार!
नाशिकच्या सिन्नरमध्ये एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला व्याजाच्या विळख्यात अडकवून तिला देहविक्रयाची धमकी देण्यात आलीय. सोबतच तिला अश्लील शिवीगाळही करण्यात आली आहे.

नाशिकच्या सिन्नरमध्ये एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला व्याजाच्या विळख्यात अडकवून तिला देहविक्रयाची धमकी देण्यात आलीय. सोबतच तिला अश्लील शिवीगाळही करण्यात आली आहे.
दाखल गुन्ह्यानुसार एका महिलेच्या मागे 30 टक्के व्याजाचा जाच लावण्यात आला. पैसे देता न आल्याने तिला अश्लील शिवीगाळ करण्यात आली. या घटनेनंतर सिन्नरमध्ये महिलेने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
हा प्रकार समोर आल्यानंतर सावकार दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 80 हजारांच्या कर्जापोटी या दाम्पत्याने 4 लाख रुपये परत घेतले. सोबतच आणखी 4 लाख 22 हजार रुपयांची हे दाम्पत्य मागणी करत होतं.
पैसे न दिल्यास तुला मारहाण करू, देहविक्रय व्यवसायात ढकलू अशी धमकी पीडित महिलेला देण्यात आली. पीडित महिलेवर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर कर्जाचा विळखा तसेच सावकारांकडून केला जाणार जाच यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.