
नांदगाव ( नाशिक )येथील मुख्य up लाईनवर मालगाडीचा डबा रुळावरून घसरला, नांदगाव रेल्वे स्थानक यार्डानजीक सकाळी 7 वाजता ही घटना घडली होती. या मालगाडीतून दौंडकडे सिमेंटची वाहतूक सुरू होती .

या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस, धुळे दादर मेमू गाड्या खोळंबल्या. अखेर रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले आणइ युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आलं.

मनमाडवरून रेल्वेचे हायड्रोलिक इन्स्ट्रुमेंट, व अपघात विभागाचे पथक घटनास्थळावर आलं होतं.

डबा घसरल्यामुळे रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्ग थोड्यावेळासाठी बंद ठेवण्यात आले होते.

अखेर मनमाड, नांदगाव येथील तांत्रिक पथकाने युद्ध पातळीवर काम करत डबा उचलला. 100 हून अधिक अधिकारी कर्मचारी यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केल्याने काम सुकर झाले.

त्यानंतर घटनास्थळावरून नांदगाव रेल्वे स्थानकाकडे गाडी रवाना करण्यात आली.

यामुळे आता रेल्वेचा मार्ग मोकळा झाला असून थोड्याच वेळात वाहतूक सुरळीत होईल.

हा डबा नेमका कसा आणि का घसरला याचे कारण शोधण्याचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू झालं आहे.