
गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरूम खोदून आणतात आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून त्याची विक्री करतात. मशरूम आरोग्याला पोषक असल्याने डॉक्टर देखील पावसाळ्यात जंगली मशरूम खाण्याचा सल्ला देखील देतात.

पावसाची हजेरी लागताच गोंदियाच्या बाजारपेठेत जंगली मशरूम विक्री करिता आली असून या जंगली मशरूमला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी तर आहेच सोबतच चांगला दर देखील मिळत असून 800 ते 1000 रुपये किलो प्रमाणाने विक्री केली जाते. तरी मशरूम खवयी मशरूम खरेदी करिता बाजारात गर्दी करीत आहे.

नैसर्गिक वन संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जगले असून मुसळधार पाऊस असतो. जंगल भागात नेसर्गिक पद्धतीने ही आळंबी स्वतः उगवतात.

गावकरी सकाळी जंगलात जाऊन आळंबी खोदून आणतात आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून त्याची विक्री करतात. सध्या मशरूमचे उत्पादन येणे सुरु झाल्याने 800 ते 1000 रुपये किलोंचा दर देखील मिळत आहे.

तर आळंबी ही आरोग्याला पोषक असल्याने डॉक्टर देखील पावसाळ्यात जंगली मशरूम खाण्याचा सल्ला देखील देतात.