
आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता सांगतात की उपवास सोडल्यानंतर लगेचच भजी, कचोरी आणि राजमा यांसारखे जड आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळावं. कारण ते पचण्यास कठीण असतात. म्हणून या काळात हलके अन्न खा.

उपवासाच्या वेळी मीठ असलेले पदार्थ खाल्ले जातात आणि जर तुम्ही उपवासानंतर लगेच आम्लयुक्त पदार्थ खाल्ले तर ते पचनसंस्थेवर अधिक दबाव आणू शकतात आणि अन्न पचवण्यास त्रास होऊ शकतो, ज्यामुळे उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात.

अल्कधर्मी पदार्थांनंतर लगेच आम्लयुक्त पदार्थ खाल्ल्याने गॅस होऊ शकतो. गोड पदार्थ खाणं देखील टाळावेत कारण ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात.

उपवास सोडल्यानंतर, तुम्ही हलके, सहज पचणारे अन्न खावे. तुम्ही फळे, नारळ पाणी किंवा भाज्यांचे सूप समाविष्ट करू शकता. खाताना देखील एका जागी शांत बसून पदार्थ खा. पाणी देखील बसून प्या...

नवरात्री आहे म्हणून अनेकांना उपवास ठेवायचा असतो. पण तुम्हाला मधुमेह किंवा इतर कोणताही आजार असेल तर उपवास करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. ज्यामुळे तुमच्या आरोग्यास हानी पोहोचणार नाही.