Navratri 2026 : नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीला काय आवडतं? 9 दिवसांचा नैवेद्य एका क्लिकवर
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची विशेष पूजा केली जाते. प्रत्येक दिवशी देवीला विशिष्ट नैवेद्य किंवा भोग अर्पण करण्याची धार्मिक परंपरा आहे. पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीला शुद्ध तूप, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीला साखर, तर तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेला दूध किंवा खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. चौथ्या दिवसापासून कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री यांना अनुक्रमे मालपुआ, केळी, मध, गूळ, नारळ आणि हलवा-पुरी-काळे चणे अर्पण केले जातात. जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ दिवसांचा खास भोग आणि त्यामागील धार्मिक महत्त्व.

पहिला दिवस (माता शैलपुत्री): गायीचे शुद्ध तूप - देवीला शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आरोग्य उत्तम राहते.
दुसरा दिवस (माता ब्रह्मचारिणी): साखर किंवा साखरेचे पदार्थ (मिश्री) - यामुळे दीर्घायुष्य आणि सुख लाभते.
तिसरा दिवस (माता चंद्रघंटा): दुधाची खीर किंवा पांढऱ्या दुधाची मिठाई - यामुळे मनातील दुःख व संकटे दूर होतात.
चौथा दिवस (माता कुष्मांडा): मालपुआ - बुद्धी, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
पाचवा दिवस (माता स्कंदमाता): पिकलेली केळी - कौटुंबिक सुख-शांती आणि आरोग्य लाभते.
साहवा दिवस (माता कात्यायनी): मध - सौंदर्य वाढते आणि विवाहातील अडथळे दूर होतात.
सातवा दिवस (माता कालरात्री): गूळ किंवा गुळाचे पदार्थ - सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळते.
आठवा दिवस (माता महागौरी): नारळ किंवा नारळाची वडी - घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि मनोकामना पूर्ण होतात.
नववा दिवस (माता सिद्धिदात्री): हलवा, पुरी आणि काळे चणे - जीवनात यश, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो.