
बाॅलिवूड अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या हड्डी या चित्रपटातील फर्स्ट लूक पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. हड्डी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत आहे.

हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, नवाजुद्दीन सिद्दीकीने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारण्यासाठी किती जास्त मेहनत घेतली यावर मोठा खुलासा हा चित्रपटाची प्रोड्यूसर राधिका नंदा हिने केला आहे.

राधिका नंदा म्हणाली की, नवाजुद्दीन सिद्दीकीचा फायनल लूकसाठी आम्हाला तब्बल 6 महिने लागले. राधिका नंदाने सांगितले की, नवाजुद्दीन सिद्दीकीला साडी घालण्यासाठी अर्धा तास आणि मेकअपसाठी तब्बल 3 तास लागायचे.

नवाजुद्दीन सिद्दीकीने जरी साडी पहिल्यांदा घातली असली तरीही साडी घालून कितीतरी तास त्याने शूटिंग केलीये. राधिका पुढे म्हणाली की, खरोखरच नवाजुद्दीन सिद्दीकी हे खूप जास्त मेहनती अभिनेता आहे.

कारण या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने तब्बल 80 साड्या या घातल्या आहेत, नक्कीच हे काम सोपे नाहीये. यापूर्वी त्याने कधीच असे काम केले नाहीये. या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीने खूप जास्त मेहतन घेतलीये.