
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील प्रसिद्ध गणपती 'लालबागच्या राजा'च दर्शन घेतलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज 'लालबागच्या राजा'च्या दर्शनाला आले होते. यावेळी त्यांचे पुत्र पार्थ पवार सोबत होते.

उद्या अंनत चतुर्दशी आहे. त्यामुळे कालपासून 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी मोठी गर्दी आहे.

अजित पवार हे असे राजकारणी आहेत, जे सकाळीच उठून कामाला सुरुवात करतात. त्याप्रमाणे आज सकाळी त्यांनी सर्वप्रथम लालबागच्या राजाच दर्शन घेतलं.

अजित पवार यांनी राजाला पुष्पहार अर्पण केला. दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं. शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले.