
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडानंतर सर्वात जास्त चर्चा शरद पवार, सुप्रिया सुळे अन् अजित पवार यांची झाली. या बंडानंतर सुप्रिया सुळे यांनी कधी अजित पवार यांच्यावर सरळ टीका केली नाही. परंतु राज्यभरात पक्षाची बांधणी करण्याचे काम त्या करत आहेत.

खासदार सुप्रिया सुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर दौऱ्यावर होत्या. पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त त्या जात होत्या. यावेळी इंदापूरमधील " पकाच्या चहा " या चहाच्या स्टोलला त्यांनी भेट दिली. त्यानंतर या ठिकाणी 'चाय पर चर्चा' सुरु झाली.

चहा घेताना सुप्रिया सुळे यांनी चहा अल्टीमेट बनवल्याचे सांगत कौतूक केले. म्हशीच्या दूधापासून बनवलेला हा चहा एक नंबर आहे. यावेळी इंदापूरमधील नंबर वन चहाचे स्टॉल असल्याचे त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांनी चहा स्टॉलच्या मालकाशी चर्चा केली.

इंदापूरमध्ये चहा पिण्याचा आस्वाद घेत दुकाने मालकाचे कौतुक केले. चहा कोणकोणत्या प्रकारचे आहेत, सकाळी दुकान कधी सुरु करतात, कुटुंबात कोण आहेत? अशी आपुलकीने चौकशी केली. त्याचवेळी चहाचे बिल कोणीतरी भर, हे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत.

" पकाच्या चहा " च्या मालकाने नम्रपणे चहाचे बिल घेण्यास नकार दिला. परंतु सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या चर्चेमुळे ते चांगलेच भरावून गेले होते. खासदार सुप्रिया सुळे यांचा साधेपणा आपणास भावल्याचे त्यांनी सांगितले.