नेत्यासाठी कायपण..शरद पवार यांनी लग्नाला यावे म्हणून कार्यकर्त्याने चक्क विवाहाचे ठिकाणच बदलले…

आपल्या नेत्यासाठी कार्यकर्ते काहीही करायला तयार होतात.हे आपण अनेक वेळा एकले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पंढरपूर येथील एका कार्यकर्त्यांने आपले नेते शरद पवार यांनी मुलाच्या लग्नाला उपस्थित राहून आशीर्वाद द्यावा यासाठी चक्क विवाहाचे ठिकाणच बदलण्याचा अनोखा प्रकार केला हा विवाह सोहळा पंढरपुरातील एका हॉटेलात आयोजित केला होता. त्यास शरद पवार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी हजर होते.

| Updated on: Apr 20, 2025 | 3:22 PM
1 / 5
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रवी पाटील यांचा मोठा मुलगा आनंद आणि प्रेरणा यांचा बोरगाव येथे आज विवाह सोहळा होणार होता,  या विवाह सोहळ्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रण दिले होते.

2 / 5
मात्र शरद पवार यांच्या आधीच ठरलेल्या व्यस्त कार्यक्रमामुळे रवी पाटील यांच्या गावी विवाहस्थळी पोहोचणे शक्य नव्हते. मग कार्यकर्त्याने आपल्या नेत्याने विवाहाला उपस्थित राहून वधू-वराला शुभेच्छा द्यावात यासाठी चक्क विवाह स्थळच बदलले.

3 / 5
वादीचे सोलापूर चिटणीस  रवी पाटील यांनी शरद पवारांच्या सोयीसाठी आपल्या गावी आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याचे ठिकाण ऐनवेळी बदलत चक्क पंढरपुरात हा विवाहाचा सोहळा स्थलांतरीत केला.

4 / 5
या विवाह सोहळ्यासाठी शरद पवार खास हेलिकॉप्टरने पंढरपुरात आले होते, दुपारी १२ वाजता त्यांनी आपल्या या कार्यकर्त्याच्या मुलाच्या विवाह स्थळी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले.

5 / 5
नेत्याने उपस्थित राहून आपल्या मुलाला आणि त्याच्या वधूला आर्शीवाद द्यावे यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्याची वेळ आणि ठिकाण बदलल्याने या विवाह विवाहाची  चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.या सोहळ्यास शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील,उत्तम जानकर,  हर्षवर्धन पाटील, अभिजीत पाटील, नारायण आबा आदी मंडळी उपस्थित होती.