
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा गुप्ता ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील नामांकित फॅशन डिझायनर आहे. मसाबाच्या फॅशनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पसंती मिळते. नुकतेत तिने स्वत:चे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मसाबाने नवीन फोटोशूट केलं असून त्याचेच फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील मसाबाच्या ड्रेसने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. तिने 'बिस्किट ब्रा' आणि त्यावर काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'बिकिनी बॉडी'च्या संकल्पनेबाबत लिहिलं आहे.

'बिकिनी बॉडी नावाची कोणतीच गोष्ट नसते, हे अखेर मला समजलं आहे. आपल्या सर्वांकडे ती गोष्ट आहे. किंबहुना आपल्या शरीरावर तिला स्थान मिळत असल्याने बिकिनीने आपले आभार मानावेत', असं तिने लिहिलंय.

या फोटोंमधील मसाबाच्या बिस्किट ब्राने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. त्यावर सोनेरी टॉफी आणि सोनेरी तळहाताची चित्रे पहायला मिळत आहेत. या फोटोशूटवर करीना कपूर खान, माहिरा खान, श्रिया पिळगावकर, नीना गुप्ता यांनीसुद्धा कमेंट्स केल्या आहेत.

फॅशन इंडस्ट्रीत मसाबाचं खूप मोठं नाव आहे. 'हाऊस ऑफ मसाबा' हा तिचा फॅशन ब्रँडसुद्धा प्रसिद्ध आहे. जानेवारी महिन्यात मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली. यावेळी मसाबाचे वडील विवियन रिचर्ड्स, सावत्र वडील विवेक मेहरा, आई नीना गुप्ता, सत्यदीपची आई आणि बहीण एकाच फ्रेममध्ये दिसले.

मसाबा ही नीना आणि विवियन यांची मुलगी आहे. नीना आणि विवियन यांचं अफेअर खूप चर्चेत होतं. मात्र या दोघांनी लग्न केलं नाही. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.