गोल्डन बॉय नीरज चोप्रा रतन टाटांची भेट घेतल्यावर म्हणाला, ते म्हणजे…

नीरज चोप्रा याने रतन टाटा यांची भेट घेतली असून दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पाहायला मिळत आहे. या भेटीनंतर नीरज चोप्राने केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.

Harish Malusare | Updated on: Mar 02, 2024 | 3:22 PM
1 / 5
गोल्डन थ्रो करत देशाला गोल्ड मेडल मिळवून देणारा नीरज चोप्रा कायम चर्चेत असलेला पाहायला मिळतो. अशातच परत एकदा नीरज चर्चेत आलाय. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची नीरज चोप्राने भेट घेतली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत नीरज याने याबाबत माहिती दिली आहे.

2 / 5
नीरज चोप्राने फोटो शेअर करताना, प्रेरणेचे खरे स्त्रोत असलेल्या रतन टाटा सरांना भेटण्याची संधी मिळाल्याचं कॅप्सशनमध्ये म्हटलं आहे. नीरज चोप्रा आणि रतन टाटा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3 / 5
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याने इतर स्पर्धांमध्येही चांगल्या प्रकारे यश मिळवलं आहे. भालाफेकमध्ये भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.

4 / 5
चोप्राने स्वीडनमध्ये 2022 मध्ये झालेल्या स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 30 जून रोजी 89.94 मीटर भालाफेक करून वैयक्तिक सर्वोत्कृष्ट आणि राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला.

5 / 5
नीरज चोप्रा याला चमकदार कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. याआधी 2021 मध्ये नीरजला मेजर ध्यानचंद खेलरत्न तर 2018 मध्ये अर्जुन पुरस्कारही त्याला देण्यात आला आहे.

Follow Us