Rohit Pawar | महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा!
राज्यात वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “एकनाथ शिंदेजी, तुम्ही सतत काही ना काही कारणाने नाराज होऊन दिल्लीला जाता, एकदा महागाईच्या मुद्द्यावरूनही नाराज व्हा,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, “पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. निवडणुका आल्या की शिंदे साहेब दिल्ली दौरे करतात आणि नाराजी व्यक्त करतात. आता महागाईच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भूमिका घ्यावी,” असा चिमटा त्यांनी काढला. यावेळी रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीका करत, “सत्तेत असलेल्या लोकांना फक्त सत्ता आणि पैसा दिसतो, सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे,” असा आरोप केला.
दरम्यान, शरद पवार गटाच्या बैठकीबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच वाढत्या पेट्रोल-डिझेल दरांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
Published on: May 25, 2026 05:08 PM
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट