AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs GT Qualifier 1 Live Streaming : गुजरात क्वालिफायर 1 साठी सज्ज, आरसीबी रोखणार?

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Qualifier 1, IPL 2026 Live Scorecard : प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्ससमोर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स संघाचं आव्हान असणार आहे. जाणून घ्या उभयसंघातील सामन्याला किती वाजता सुरुवात होणार.

RCB vs GT Qualifier 1 Live Streaming : गुजरात क्वालिफायर 1 साठी सज्ज, आरसीबी रोखणार?
Mohammad Siraj RCB vs GT IPLImage Credit source: PTI
| Updated on: May 26, 2026 | 2:04 AM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत साखळी फेरीचा जबरदस्त शेवट झाल्यानंतर आता 26 मे पासून प्लेऑफचा थरार रंगणार आहे. प्लेऑफ फेरीत मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत पोहचण्याची संधी असणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत पोहचण्याची 1 अतिरिक्त संधी मिळेल. मात्र त्यानंतरही दोन्ही संघांची पहिल्याच झटक्यात सामना जिंकून अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे क्वालिफायर 1 मॅचमध्ये चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

क्वालिफायर 1 मॅचमध्ये गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना रंगणार आहे. शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. तर रजत पाटीदार आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामना कधी?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामना मंगळवारी 26 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामना कुठे?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामना धर्मशालेतला एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल. तर https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/series/ipl या लिंकवर लाईव्ह ब्लॉगद्वारे या सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येईल.

आरसीबी-गुजरात तुल्यबळ

दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स दोन्ही संघांची क्वालिफायर-1 निमित्ताने या स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही नववी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघात एकूण 8 सामने खेळव्यात आले आहेत. या 8 पैकी दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे मंगळवारी कोणता संघ विजयी पंच लगावून फायनलचं तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या, व्हिडिओवर नेटकरी फिदा
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
Roha Accident | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...