AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई

वैजापूर येथील भवानी स्वीटमध्ये कचोरीत उंदराच्या लेंड्या आढळल्याच्या आरोपानंतर FDA ने तातडीने कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरासे यांनी दुकानाची तपासणी केली असता, विना परवाना फूड बिजनेस केल्याचंही आढळलं.

कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई
| Updated on: Aug 24, 2026 | 7:50 PM
Share

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथील भवानी स्वीट या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली. या दुकानातील कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्याचा आरोप एका ग्राहकाने केल्यानंतर प्रशासनाने दुकानाची तपासणी केली. तपासणीदरम्यान दुकानात विना परवाना खाद्य व्यवसाय सुरू होता, असं आढळून आलं. तसेच, अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या शेड्युल 4 मधील स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचंही तपासणीत समोर आलं.  या गंभीर बाबींची दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरासे यांनी कारवाई करत संबंधित दुकान सील केलं.

अन्न व औषध प्रशासनातर्फे (FDA) सध्या राज्यात धाडींचं सत्र सुरू असून त्यामुळे रेस्टॉरंट मालक, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे.  FDAतर्फे अनेक ठिकाणी धडक टाकून स्वच्छता, सुरक्षेचे निकष, लायसन्स यांचा आढावा घेतला जात असतो. या कारवायांमध्ये भेसळयुक्त किंवा नियमांचे उल्लंघन करणारे खाद्यपदार्थ आढळल्यावर ते नष्ट करण्यात आले.   स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्या, भेसळ करणाऱ्या अनेक दुकानदारांविरोधात आत्तापर्यंत कारवाई करण्यात आली. तसेच काही आस्थापनांचा परवानाही रद्द करण्यात आला. एफडीएच्या या मोहिमेत आत्तापर्यंत अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध खाद्यपदार्थांच्या ब्रँड्सवरही कारवाई करण्यात आल्याने याची चांगलीच चर्चा आहे. तर आता छत्रपती संभाजनगरमधील वैजापूर येथे करण्यात आलेल्या या कारवाईचीही आता जोरदार चर्चा होत आहे.

काय आहे प्रकरण ?

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील एका दुकानातील कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्या.मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने या दुकानात कचोरी विकत घेतल्या होत्या. मात्र घरी गेल्यावर त्या पाच कचोरींमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्या , असा आरोप त्या ग्राहकाने केला.धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यापैकी 2 कचोऱ्या या मुलांनी खाल्ल्याचाही दावा त्याने केला. या कटोरी सेंटरमधून आणलेल्या कचोरीमध्ये लेंड्या आढळल्याचा आरोप झाल्यानंतर FDAने याची गंभीर दखल घेतली आणि संबंधित कचोरी सेंटरवर कारवाई केली.

या दरम्यान हे कचोरी सेंटर विनापरवाना सुरू होतं, असंही तपासणीत समोर आलं.  वैजापूर शहरातील कचोरी सेंटरमधील हा धक्कादायक प्रकार असल्याची माहिती समोर आली.  अखेर एफडीने कारवाई करत हे दुकान सील केलं. मात्र या प्रकारामुळे मोठी खळबळ माजली.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु