AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताजमहालपेक्षा सुंदर, शेतकऱ्याने पत्नीच्या मृत्यूनंतर शेतात…, 17 वर्षानंतर फोटो पाहून सर्वच झाले थक्क

पत्नीच्या आठवणीत शेतकऱ्याने उभारलं 6 हजार झाडांचं 'प्रेमाचं जंगल'. थेट 17 वर्षांनी आकाशातून समोर आली या जंगलाची हृदयस्पर्शी कहाणी. ऐकून तुम्ही कराल कौतुक.

ताजमहालपेक्षा सुंदर, शेतकऱ्याने पत्नीच्या मृत्यूनंतर शेतात..., 17 वर्षानंतर फोटो पाहून सर्वच झाले थक्क
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 23, 2026 | 8:25 PM
Share

खरं आणि निस्वार्थ प्रेम काळाच्या ओघात संपत नाही, ते आठवणींच्या रूपाने जिवंत राहतं. इंग्लंडमधील साउथ ग्लॉस्टरशायर परिसरातील शेतकरी विन्स्टन हॉवेस यांची कहाणी याचं सुंदर उदाहरण आहे. पत्नीच्या निधनानंतर तिच्या आठवणी जपण्यासाठी त्यांनी तब्बल 6 हजार ओकची झाडं लावून हृदयाच्या आकाराचं जंगल उभं केलं.

विन्स्टन आणि त्यांची पत्नी जेनेट यांचं 1962 मध्ये लग्न झालं होतं. तब्बल 33 वर्षांचा संसार केल्यानंतर 1995 मध्ये जेनेट यांचं अचानक निधन झालं. पत्नीच्या जाण्याने विन्स्टन यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, त्यांनी त्या दुःखाला वेगळं रूप देण्याचा निर्णय घेतला.

मोकळ्या जागेचा आकार होता हृदयासारखा

पत्नीच्या आठवणींना कायमस्वरूपी जपण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात ओकची रोपं लावण्यास सुरुवात केली. एक-दोन नाही तर तब्बल 6 हजार झाडं त्यांनी लावली. सुमारे सहा एकर परिसरात ही झाडं वाढत गेली आणि काही वर्षांतच तिथे दाट जंगल तयार झालं. मात्र, जंगलाच्या मध्यभागी त्यांनी मुद्दाम एक मोठी मोकळी जागा ठेवली. या मोकळ्या जागेचा आकार होता हृदयासारखा.

या हृदयाकृती जागेचं टोक जेनेट ज्या भागात लहानाच्या मोठ्या झाल्या, त्या त्यांच्या बालपणातील घराच्या दिशेने ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे हे केवळ झाडांचं जंगल नव्हतं तर पत्नीच्या आठवणींना दिलेलं एक जिवंत स्मारक होतं.

अनोखी प्रेमकहाणी

विशेष म्हणजे, हे प्रेमाचं अनोखं स्मारक जवळपास 17 वर्षे जगाच्या नजरेपासून दूर राहिलं. जमिनीवरून पाहिलं तर तिथे फक्त दाट जंगल दिसत होतं. मात्र, 2012 मध्ये एका हॉट-एअर बलूनमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतून या जंगलाचा हृदयाकृती आकार आला आणि विन्स्टन यांची ही अनोखी प्रेमकहाणी जगासमोर आली.

10 of the Most Beautiful Hearts on Earth

विन्स्टन यांनी या हृदयाच्या मोकळ्या जागेत एक लाकडी बाकही ठेवला होता. ते अनेकदा तिथे शांतपणे बसून पत्नीच्या आठवणींमध्ये रमायचे. मानसशास्त्रात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर तिच्याशी असलेलं भावनिक नातं आठवणी, वस्तू किंवा एखाद्या खास जागेच्या माध्यमातून पुढे सुरू ठेवण्याच्या प्रक्रियेला ‘कंटिन्युइंग बाँड्स’ म्हटलं जातं. विन्स्टन यांचं हे जंगल त्याच भावनेचं सुंदर उदाहरण मानता येईल.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान