AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर

khavdya dongar case: छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरील त्या मृत्यूने अवघा महाराष्ट्रच नाही तर देश हादरला. या मृत्यू प्रकरणात अनेक कांगोरे समोर येत आहे. दोन दावे प्रामुख्याने समोर येत आहे. आयफोन आणि कौटुंबिक वाद यातून ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.

मी तुमच्या पाया पडेन...असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
कुणाल, संगिता आणि मुरलीधर चांदगुडे
| Updated on: Aug 23, 2026 | 11:42 PM
Share

खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबातील मृत्यू प्रकरणात गेल्या दोन दिवसात अनेक वेगवेगळ अँगल समोर आले आहेत. सुरुवातीला आयफोनचे कारण समोर आले. मग महागड्या फोनच्या थकीत हप्त्यावरून वाद टोकाला गेल्याचे म्हटले गेले. तर या वादाचे मूळ कारण कुटुंबातील वाद असल्याचे समोर आले आहे. आई, वडील आणि मुलाच्या एकाचवेळी मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला. कुणाल चांदगुडे, आई संगिता आणि वडील मुरलीधर या सर्वांचाच खवड्या डोंगरावरून खाली पडून मृत्यू झाला. या घटनेने समाजमन हेलावले. सगळीकडे या गोष्टीची चर्चा आहे. संगिता यांच्या जुन्या व्हिडिओतून आता या प्रकरणातील काही कांगोरे समोर येत आहे.

मी तुमच्या पाया पडेन… असं होत नसतं

संगिता आणि मुरलीधर यांच्या लग्नाविषयी घरच्यांना उशीरा माहिती दिल्याचे अथवा हे लग्न त्यांना मान्य नसल्याचे सुरुवातीच्या प्रतिक्रियातून दिसून येते. यामुळे कुटुंबात सूनेवरून विसंवाद होता, हे आता समोर येत आहे. तर संगिता यांच्या युट्युबवरील जुने व्हिडिओ समोर आले. त्यात त्यांनी नणंदेला सुनावल्याचे दिसून येते. भावाला बोलावून घेतले म्हणजे मुलांचं शिक्षण बंद होईल. आमचे हाल होतील. मी तुम्हाला फोन करेल. तुमची विनवणी करेल. पाया पडेन. असं वाटत असेल तर असं होत नसतं, असे संगिता ठणकावताना दिसतात.

माय-लेकाचे व्हिडिओ

संगिता यांच्या व्हिडिओत अनेकदा मुलासोबत भावनिक क्षण शेअर केले आहेत. त्यातील काही व्हिडिओत ते चहा घेताना दिसतात. एका व्हिडिओत कुणाल आईच्या पाय धुताना दिसत आहेत. तर आईची ओटी भरत आहे. नवीन पिढी, तिचे विचार याचे कौतुक करताना संगिता दिसतात. आता पोलीस या व्हिडिओ आधारे या कुटुंबातील गुंतागुंत सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. कुणालने इतक्या टोकाचे पाऊल का टाकले हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्याचे ठोस कारण अद्यापही समोर आलेले नाही. प्रत्येकजण त्याच्या नजरेतून या घटनेकडे पाहत आहे. ज्यांच्यात वादाची किनार होती. ते तिघेही हयात नाही. खवड्या डोंगर मात्र या घटनेने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या डोंगरावर जाण्यास मज्जाव करण्यात यावा. तिथे पोहचण्यास जाणारी वाटच बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे. प्रशासन या मागणीकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि ते कितपत सोयीस्कर आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...