AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बात निकली तो… बाबा रामदेव- कंगना रनौतमध्ये शिलगली, म्हणाले मला अशा लोकांवर…

Baba Ramdev slams Kangana Ranaut: खासदार कंगना रनौत आणि योगगुरू रामदेव बाबा यांच्यातील वाकयुद्ध थांबलेले नाही. दोघांमध्ये चांगलीच शिलगली आहे. त्यांनी पुन्हा एकदा कंगना यांच्यावर निशाणा साधला. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बात निकली तो... बाबा रामदेव- कंगना रनौतमध्ये शिलगली, म्हणाले मला अशा लोकांवर...
बाबा रामदेव, कंगना रनौतImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 23, 2026 | 10:47 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत आणि योगगुरू रामदेव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा सुरू आहे. रनौत यांनी रामदेव बाबांविषयी एक तिखट टिप्पणी केली होती. त्यावर रविवारी रामदेव बाबांनी जोरदार पलटवार केला. काही क्षुल्लक लोकांविषयी मी कोणतीच टिप्पणी करू इच्छित नाही. रामदेव बाब कोण आहेत आणि त्यांनी काय काम केले हे देशातील लोकांना माहिती आहे, असे ते म्हणाले. दोघांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे.

असा भडकला वाद

दोघांमध्ये वार-पलटवार सुरू आहे. खासदार कंगना रनौत यांनी Gen-Z ला ‘गटर जनरेशन’ म्हटले होते. त्यावर रामदेव बाबांनी हरकत घेतली होती. मी आशा लोकांविषयी काहीच बोलू इच्छित नाही. तरुणांना जनरेशन गटर म्हणणे एक वाईट विचारांची निशाणा आहे, असा फटकारा त्यांनी लगावला होता. त्यावर माझे तारुण्य अथवा माझ्या बेडरूममधील आयुष्याविषयी काल्पनिक कथा, गोष्टी रचू नका असे रनौत म्हणाल्या होत्या.

रामदेव बाबांचा पुन्हा एकदा निशाणा

योगगुरू रामदेव बाबा यांनी रविवारी कंगणा रनौत यांच्या टिप्पणीबाबत प्रतिक्रिया दिली. आता या विषयावर मी काय बोलू? मी वाद वाढवू इच्छित नाही. स्वामी रामदेव काय आहे हे देश जाणतो. रामदेव बाबाचं योगदान काय आहे. हे देशाला माहिती आहे. यामुळे क्षुल्लक लोकांवर मी टिप्पणी करू इच्छित नाही. मी त्यांच्यावर टिप्पणी करून वाद वाढवू इच्छित नाही. त्यांच्या या सणसणीत टोल्यानंतर वाद संपण्याऐवजी तो वाढला आहे.

एक देश, एक निवडणूक व्हावी

चर्चेदरम्यान रामदेव बाबा यांनी एक देश, एक निवडणूक व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. वारंवार होणाऱ्या निवडणुका या देशाच्या विकास प्रक्रियेसोबत शिक्षण व्यवस्थेवरही प्रभाव टाकते. देशात वर्षभरात कुठे ना कुठे निवडणुकीची प्रक्रिया सुरूच असते. यामुळे यंत्रणेवर ताण असतो. एकदाच निवडणुका झाल्या तर विकासाला गती मिळेल आणि शिक्षण सुधारणेकडे लक्ष देण्यास वेळ मिळेल, असा युक्तीवाद त्यांनी केला.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान