AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज

43 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, जे बहिण-भावाच्या रक्षाबंधन सणावर आहे खास. ज्यामध्ये हेमा मालिनी आणि रजनीकांत यांची जोडी ठरलेली खास. आशा भोसले यांच्या आवाजामुळे गाणं आजही सुपरहिट.

रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 24, 2026 | 4:35 PM
Share

रक्षाबंधनाचा सण जवळ आला आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि अतूट नात्याचा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदी चित्रपटसृष्टीनेही या सुंदर नात्यावर अनेक संस्मरणीय गाणी दिली आहेत. काळ बदलला, कलाकार बदलले आणि गाण्यांची शैलीही बदलली, मात्र भाऊ-बहिणीच्या प्रेमाची भावना आजही तितकीच कायम आहे.

अशाच जुन्या आणि लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणे 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंधा कानून’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात रजनीकांत आणि हेमा मालिनी यांनी भाऊ-बहिणीची भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, प्राण, रीना रॉय, डॅनी, अमरीश पुरी आणि प्रेम चोप्रा यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते.

चित्रपटाची कथा सूड आणि अन्यायाभोवती फिरते. रजनीकांत यांनी साकारलेला विजय आपल्या बहिणीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तीन आरोपींचा शोध घेत असतो. दुसरीकडे, त्याची बहीण दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या हेमा मालिनी पोलिस दलात दाखल होतात. दुर्गाला कायद्याच्या मार्गाने गुन्हेगारांना शिक्षा द्यायची असते तर विजय स्वतःच्या हाताने त्यांचा बदला घेण्याची शपथ घेतो.

भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि भावनिक आठवणी

याच दरम्यान विजयची भेट अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या जान निसार खानशी होते. अन्यायामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेला खान विजयला मदत करण्याचा निर्णय घेतो. पुढे विजय, दुर्गा आणि खान हे तिघेही आपल्या शत्रूंविरोधात लढताना दिसतात.

मात्र या चित्रपटातील रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरचे गाणे आजही विशेष लक्षात राहते. हे गाणे रजनीकांत आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले असून त्यामध्ये भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि भावनिक आठवणी प्रभावीपणे दाखवण्यात आल्या आहेत.

या गाण्याचे बोल आनंद बक्षी यांनी लिहिले असून आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी ते आपल्या आवाजात गायले आहे. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीताने सजलेले हे गाणं आजही रक्षाबंधनाच्या निमित्ताने आवर्जून आठवले जाते.

हेमा मालिनींसोबत रक्षाबंधनाचा आनंद साजरा

गाण्यात रजनीकांत हेमा मालिनींसोबत रक्षाबंधनाचा आनंद साजरा करत असताना आपल्या दिवंगत बहिणीच्या आठवणीत हरवून जातात. जुन्या आठवणींमुळे त्यांच्या मनात सूडाची भावना पुन्हा जागी होते; मात्र समोर असलेल्या बहिणीला पाहून ते पुन्हा वर्तमानात परततात.

भाऊ-बहिणीचे प्रेम, विरह, आठवणी आणि भावनिक नाते यांचा सुंदर मिलाफ असलेले हे गाणं आजही रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या आठवणी ताज्या करते.

Follow Us
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?