खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता आज वितरित करण्यात आला. ६.३६ लाख शेतकऱ्यांना ५,०८६ कोटी रुपये एका क्लिकद्वारे थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत १२.५६ लाख शेतकऱ्यांना एकूण १०,११५ कोटी रुपयांची मदत मिळाली आहे, ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता आज वितरीत करण्यात आला आहे. एका क्लिकद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. आज एकाच दिवशी ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण १२ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना १० हजार ११५ कोटी रुपयांचे कर्जमाफ करण्यात आले आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून, शेती व्यवसायाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ही कर्जमाफी योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.
Published on: Aug 24, 2026 04:31 PM
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..

