AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात 30 हजार शिक्षकांची मेगाभरती! कुठे आणि कसा करणार अर्ज? शेवटची तारीख काय?

Maharashtra Teacher Recruitment: राज्यातील डीएड. बीएड उमेदवारांसाठी आनंदवार्ता आहे. राज्यात शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. या पदासाठी कुठे आणि कसा अर्ज करायचा? अर्ज करण्याची अखेरची तारीख जाणून घ्या.

राज्यात 30 हजार शिक्षकांची मेगाभरती! कुठे आणि कसा करणार अर्ज? शेवटची तारीख काय?
राज्यात मेगा शिक्षक भरती
| Updated on: Aug 07, 2026 | 8:42 AM
Share

शिक्षक होण्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील हजारो उमेदवारांसाठी आनंदवार्ता आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शाळांमध्ये शिक्षकांची भरती होणार आहे. राज्यातील 30 हजार 209 रिक्त पदांसाठीची महाभरती प्रक्रिया राबवली जाईल. प्राथमिकपासून ते उच्च माध्यमिक शिक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे. विविध वर्गांसाठी शिक्षक निवड होईल आणि उमेदवारांना 6 ऑगस्टपासून त्यांचा प्राधान्यक्रम निवडता येणार आहे. त्यासाठी पवित्र पोर्टल खुले झाले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था , खाजगी आस्थापनामध्ये पवित्र पोर्टल द्वारे भरती होत आहे.

30 हजार 209 रिक्त पदांसाठीची महाभरती

राज्यात 30 हजार 209 रिक्त पदांसाठीची महाभरती होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शाळांमधील शिक्षण सेवक आणि शिक्षक पदांची भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येईल. ही प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ताधारीत असेल. 11 ऑगस्ट पर्यंत अर्ज लॉक करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषदेतील 13 हजार 351 , महापालिका 1954, नगरपालिका आणि नगरपरिषद 280, आदिवासींचे विकास विभाग 2421 खाजगी शिक्षण संस्था 12 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.

TAIT उमेदवारांसाठी माहिती काय?

शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार TAIT परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी tait2025.mahateacherrecruitment.org.in या अधिकृत संकेतस्थळावर 11 ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेनंतर 19,881 पदांसाठी मुलाखतीशिवाय पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. या पारदर्शक प्रक्रियेमुळे गुणवंत उमेदवारांचे शिक्षक भरतीचे स्वप्न पूर्ण होईल.

तीन महिन्यात पद भरती प्रक्रिया करणे बंधनकारक

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती आणि अनुषांगिक बाबीसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांबाबतचा अध्यक्षादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात सक्षम प्राधिकाऱ्याने जाहिरात देण्यास परवानगी दिल्यापासून संस्थेने सदर पद भरण्याची कार्यवाही तीन महिन्यांच्या आत करणे बंधनकार राहील असे स्पष्ट केले आहे.

अशी होणार राज्यात शिक्षक भरती

व्यवस्थापननिहाय रिक्त पदे

जिल्हा परिषद -१३३५१ नगरपालिका-नगरपरिषदा – २८०

महानगरपालिका – १९५४

आदिवासी विकास विभाग – २४२१

शासकीय विद्यानिकेतन – ५६

खासगी शिक्षण संस्था – १२१४८

गटनिहाय रिक्त पदे

पहिली ते पाचवी – १४३२०

सहावी ते आठवी – १००१२

नववी ते दहावी – ५५१३

अकरावी ते बारावी – ३६४

Follow Us
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम