AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 3 अन्न आस्थापनांवर FDAची कारवाई; तपासणीत नेमकं काय काय आढळलं?

FDA Action : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परमीट रूम, पॅव्हिलियन आणि मेडिटेरियन या तीन अन्न आस्थापनांवर FDA ने कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 3 अन्न आस्थापनांवर FDAची कारवाई; तपासणीत नेमकं काय काय आढळलं?
FDA Action against MCAImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 24, 2026 | 8:07 PM
Share

मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित तीन अन्न आस्थापनांवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. परमीट रूम, पॅव्हिलियन आणि मेडिटेरियन या तीन अन्न आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्यानंतर त्यांचे FSSAI परवाने निलंबित करण्यात आले आहेत. FDAच्या या कारवाईमुळे अन्न आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

20 ऑगस्टला FDAची तपासणी

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी 20 ऑगस्ट 2026 रोजी या तीनही अन्न आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान स्वच्छता, अन्नसुरक्षा, तापमान नियंत्रण, खाद्यपदार्थांची साठवणूक आणि उपकरणांची स्वच्छता यासंदर्भात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. परमीट रूमच्या तपासणीदरम्यान रेफ्रिजरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्याचे आढळून आले. तसेच फरशी निसरडी आणि अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. खाद्यपदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक आणि तापमान नियंत्रणाबाबतही त्रुटी आढळल्या होत्या.

पॅव्हेलियनमध्ये खाद्यपदार्थांचे योग्य विलगीकरण नाही

पॅव्हेलियन या आस्थापनातील कोल्ड स्टोरेजची तपासणी केली असता विविध खाद्यपदार्थांचे योग्य विलगीकरण करण्यात आली नसल्याचे आढळले. खाद्यपदार्थांच्या साठवणुकीत आवश्यक असलेली अन्नसुरक्षा प्रक्रिया पाळली जात नसल्याचेही FDAच्या तपासणीत समोर आले. तर मेडिटेरियनमध्ये खराब आणि अस्वच्छ भांडी आढळून आली. या उपकरणांच्या स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले आहे.

खाद्यतेलाचीही नियमित तपासणी नाही

तिन्ही आस्थापनांमध्ये खाद्यतेलाची नियमित तपासणी केली जात नसल्याचे FDAच्या निदर्शनास आले. तसेच फूड ग्रेड आणि Conformity प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्याचेही आढळून आले आहे. काही ठिकाणी खराब कच्चा माल देखील आढळला असल्याचे समोर आले आहे.

फ्रोझन फूडच्या हाताळणीत त्रुटी

तपासणीदरम्यान फ्रोझन फूडचे योग्य पद्धतीने वितळवले जात नसल्याचे आढळले. खाद्यपदार्थांचे आवश्यक तापमान नियंत्रणही समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय संबंधित आस्थापनांनी FSSAI परवाना प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केला नसल्याचेही समोर आले आहे,

21 ऑगस्टला परवाने निलंबित

या सर्व त्रुटींच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत FDAने कारवाई केली. 21 ऑगस्ट 2026 रोजी आदेश काढून परमीट रूम आणि पॅव्हिलियनचे FSSAI परवाने निलंबित करण्यात आले. मेडिटेरियन या अन्न आस्थापनाविरोधातही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. FDA ने अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Follow Us
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी