AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?

Salman Khan On Batwara: 'बंटवारा 1947' हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर खूप चालला नाही, पण अनेकांना तो आवडलाय. अभिनेता सलमान खाननेही नुकताच तो पाहिला आणि थेट फोन लावला तो..

Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?
Actor Salman Khan
| Updated on: Aug 24, 2026 | 6:21 PM
Share

Salman Khan On Batwara : सनी देओल, प्रीति झिंटा, शबाना आजमी, अली फजल आणि करण देओल यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला ‘बंटवारा 1947’ चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाची जादू फार चालली नाही, त्यामुळे कमाई देखील यथातथाच झाली. मात्र अनेकांना हा चित्रपट आवडला. इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ ची ‘बंटवारा 1947’ शी बॉक्स ऑफीसवर टक्कर झाली. त्यामुळे चित्रपटाल मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. चाहत्यांचा मोठा रिस्पॉन्स या चित्रपटाला मिळाला नसला तरीही बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना मात्र हा पिक्चर खूप आवडला. नुकतंच अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. आता त्यानंतर बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खाननेही हा चित्रपट पाहिला. सलमानला हा चित्रपट खूप आवडल्याचं समजतंय, खुद्द सनी देओलचा मुलगा आणि ‘बंटवारा 1947’मध्ये काम करणारा अभिनेता करण देओलनेच ही गोष्ट उघड केली.

करण देओलने नुकत्याच एका चॅनेलला मुलाखत दिली, त्यावेळी तो सलमान खानबद्दलही बोलला. ‘ ते (आमच्या) कुटुंबावर खूप प्रेम करतात. ते खूप सपोर्टिव्ह आहेत. नेहमीच आमच्या पाठिशी असतात. त्यांचं प्रेम अगदी खरं आहे. खरंच एक ग्रेट माणूस,,’ असं म्हणत करणने सलमानची स्तुती केली.

‘बंटवारा 1947’ पाहून काय म्हणाला सलमान ?

सलमान खानने ‘बंटवारा 1947’ पाहिला का, त्याची त्यावर काय प्रतिक्रिया होती ? असा सवाल यावेळी करणला विचारण्यात आला. ‘ हो, हो.. त्याने पाहिला ना. सलमान सरांनी पिक्चर पाहिला आणि बाबांना (सनी देओल) कॉल केला. त्यांना तो पिक्चर खूप आवडला आणि बाबांचं कामही..’ असं करणने नमूद केलं.

‘बंटवारा 1947’ ची कमाई किती ?

सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला ‘बंटवारा 1947’ हा 14 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाला. पण त्यासोबतच इम्रान हाश्मीचा ‘आवारापन 2’ देखील प्रदर्शित झाला. सनी देओलचा चित्रट इम्रान हाश्मीच्या चित्रपटावर भारी पडेल, असा सगळ्यांचा अंदाज होता, मात्र त्याच्या अगदी उलट झालं न राव ! राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेल्य या चित्रपटाला पहिल्याच दिवशी ‘आवारापन 2’ ने मागे टाकलं.

रिलीज झाल्यानंतरच्य दुसऱ्या रविवारी ‘बंटवारा 1947’ने फक्त 1.30 कोटी कमावले, तर ‘आवारापन 2’ने 8.75 कोटींची दणदणीत कमाई केली. 10 दिवसांत ‘बंटवारा 1947’ ने जगभरात (ग्रॉस) 52.52 कमाले असून आवारापन 2’ ने आत्तापर्यंत 19 दिवसांत 192.80 कोटींची (ग्रॉस) धमाकेदार कमाई केली.

Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...