Rakshabandhan 2025 : बहीण जिवंत नाही तरीही भावानं त्याच हातानं बांधली राखी, डोळे पाणावणारी रक्षाबंधनाची अनोखी ‘गाठ’
बहीण जिवंत नसताना देखील तिच्या हाताने भावाने राखी बांधून घेतली आहे. डोळे पाणावणारी रक्षाबंधनाची अनोखी कहाणी...
आज देशभरात बहीण भावाच्या पवित्र नत्याचा सण रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. अशातच रक्षाबंधनाच्या काही अनोख्या कहाण्या देखील समोर येत आहेत. अशीच एक कहाणी ज्याने तुमचे डोळे पाणावतील. ब्रेन हॅमरेजमुळे ९ वर्षीय रिया मिस्त्रीचा २०२४ मृत्यू झाला पण मृत्यूपूर्वी तिचा हात १६ वर्षीय अन्मता अहमद या मुलीला देण्यात आला होता. बहीण गमावलेल्या रियाचा भाऊ शिवम मिस्त्रीला राखी बांधण्यासाठी अन्मता अहमद थेट वलसाडला गेली आणि तिने रक्षाबंधन साजरी केली. २०१६ पासून हात गमावलेल्या अन्मताला गेल्यावर्षी हात डोनेट करण्यात आला होता. बहीण गमावलेल्या शिवमचा हात राखीशिवाय राहू नये म्हणून अन्मताने वलसाडला जाऊन रक्षाबंधन साजरे केले.
अन्मता अहमदचा २०१६ साली उत्तरप्रदेशमधल्या तिच्या घरच्या टेरेसवर खेळताना विजेच्या वायरला हात लागून हात निकामी झाला होता. गेल्यावर्षी रिया मिस्त्रीच ब्रेज हॅमरेज झाल्यानंतर तिच्या मृत्यूपूर्वी लोअर परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कुटुंबियांच्या संमतीने अन्मताला अहमदला हा हात दान करून करण्यात यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली होती. शिवमला यंदाचं रक्षाबंधन त्याच्याच बहिणीच्या हाताने राखी बांधून अन्मताने त्याची बहीण अजुनही त्याच्या सोबत असल्याचा विश्वास दिलाय.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

