AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू

करतारपूर येथे एका महिलेचा टॉयलेट क्लीनर पाजल्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. तिचा पती आणि सासूने तिला विष पाजल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. उपचारादरम्यान नेहाचा मृत्यू झाला. पोलिसांनी पती-सासूविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत. कुटुंबीयांनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू
| Updated on: Aug 24, 2026 | 10:16 PM
Share

पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील करतारपूर येथे एका महिलेच्या मृत्यूने मोठी खळबळ माजली. टॉयलेट क्लीनर पाजून तिचा जीव घेण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नेहा नावाच्या महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिला जालंधर येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरोधात आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.

पती आणि सासूने पाजलं टॉयलेट क्लीनर

मृत महिला नेहा ही उमंग बस्सी याची पत्नी होती. मात्र तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, नेहाचा पती आणि सासूने तिला टॉयलेट क्लीनर पाजलं. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. गंभीर अवस्थेत नेहाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होत. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली आणि उपचारांदरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

दोन्ही आरोपी फरार

पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून नेहाचा पती तसेच सासूविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांचा शोध सुरू केला आहे. नेहाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा पती आणि सासू हे दोघेही तिच्या 6 वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन तेथून फरार झाले, असा आरोप कुटुंबियांनी केला. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधार्थ विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

नेहाच्या मृत्यूनंतर तिचे पोस्टमॉर्टम करून तिचा मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी कुटुंबियांकडून केली जात आहे. एवढंच नव्हे तर नेहाचा पती, आरोपीचे दुसऱ्या एका तरुणीसोबत कथित संबंध आहेत, असा आरोपही कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते, मात्र त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार