AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले

Guinea Landslide : गिनीची राजधानी कोनाक्री येथे भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
guinea landslide 22 diedImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 23, 2026 | 11:44 PM
Share

पश्चिम आफ्रिकेतील देश गिनीची राजधानी कोनाक्री येथे भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. कोनाक्री येथील सर्वात मोठा कचरा डेपो म्हणजेच दार एस सलाम या ठिकाणी रविवारी पहाटे ही घटना घडली. येथे कचऱ्याचा मोठा ढिगारा अचानक कोसळल्याने परिसरात मोठी दुर्घटना घडली. असोसिएटेड प्रेसने गिनीच्या सिव्हिल प्रोटेक्शन सर्व्हिसच्या प्राथमिक आकडेवारीचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.

झोपड्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या

समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे 3 वाजता कोनाक्रीमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा सरकू लागला आणि त्यातून भूस्खलन झाले. या कचरा डेपोच्या आसपास उभारलेल्या झोपड्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कचरा डेपो बंद केला जाणार होता

मिलिटरी इंजिनिअरिंग बटालियनचे स्वच्छता अधिकारी लेफ्टनंट कर्नल बाल्डे मामादोउ बैलो यांनी सांगितले की, दार एस सलाम येथील हा कचरा डेपो रविवारीच बंद केला जाणार होता. तसेच कचरा डेपोच्या आसपास राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना यापूर्वीच परिसर रिकामा करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक नागरिकांनी आपली घरे आणि तात्पुरती ठिकाणे सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले होते. मात्र, दुर्घटना घडली तेव्हा मोठ्या संख्येने लोक या परिसरात उपस्थित होते. त्यामुळेच 22 लोकांचा मृत्यू झाला आहे.

उर्वरित लोकांचे सुरक्षित स्थलांतर करणार

दुर्घटनेनंतर गिनी सरकारचे मंत्री डिएनाबू तुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘या परिसरात राहणाऱ्या सर्व कुटुंबांना सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले जाईल. प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून, उर्वरित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी नेले जाईल.’

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान