AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या

देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या असून, त्यांना भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. या समितीतील प्रवेशामुळे फडणवीसांचे राष्ट्रीय राजकारणातील वजन वाढेल आणि महाराष्ट्रातही त्यांची ताकद अधिक मजबूत होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या
devendra fadnavis Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 24, 2026 | 4:03 PM
Share

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असून केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं आहे. फडणवीस यांनी केंद्रात मंत्री होणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी दिल्लीत मात्र फडणवीस यांना मोठी संधी मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत एंट्री मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांच्या दिल्लीतील वाऱ्या वाढल्याचंही सांगितलं जात आहे. संसदीय समितीवर नियुक्ती झाल्यास देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीत तर वजन वाढणार आहेच, पण राज्यातही फडणवीस सर्वात ताकदवर नेते होणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या असून ते मंगळवारीही दिल्ली असतील. यामागे भाजपच्या सगळ्यात ताकदवर मानल्या जाणाऱ्या संसदीय समितीत मुख्यमंत्री फडणवीसांची एंट्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते इच्छुक असले तरी मी महाराष्ट्रातच राहणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून त्यात फडणवीसांचा समावेश न होता त्यांची एंट्री संसदीय समितीत झाली तर फडणवीसांची ताकद भाजपात आणखी वाढणार आहे. फडणवीसांच्या संसदीय समितीच्या एंट्रीला संघाचा पाठिंबा असल्याच्या चर्चा आहे. फडणवीस यांची संसदीय समितीत एंट्री होणारच आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

12 सदस्यांमध्ये फडणवीस येणार

भाजपच्या संसदीय समितीत सध्या एकही मुख्यमंत्री नाही. जर फडणवीसांची एंट्री झाली तर राष्ट्रीय राजकारणात भाजपच्या अंतर्गतही फडणवीसांची ताकद वाढणार आहे. याआधी नितीन गडकरी भाजपच्या संसदीय समितीत होते. पण 17 ऑगस्ट, 2022ला गडकरींना संसदीय समितीतून काढून टाकण्यात आलं. सध्या फडणवीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. भाजपच्या संसदीय समितीत सध्या 12 सदस्य आहेत. या समितीत मुख्यमंत्र्यांना सामील करायचे की नाही, याबाबत भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

योगी आदित्यनाथ आणि शर्मा

2006साली राजनाथ सिंह यांनी संसदीय समितीतून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बाहेर काढलं होतं. या संसदीय समितीतून भाजपात मुख्यमंत्र्यांची निवड होते, त्यामुळे मुख्यमंत्री या समितीत असेल तर काय होईल; याबाबत सध्या अंतर्गत चर्चा सुरु आहे. सध्या योगी आदित्यनाथ, फडणवीस, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना समितीत सामील करून घेण्याच्या चर्चा सुरू आहेत. पण महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व म्हणून फडणवीसांची संसदीय समितीत मोठी दावेदारी असल्याची चर्चा आहे.

आणखी पॉवरफूल होतील

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 120 सदस्य आहेत. पण भाजपची संसदीय समिती मुख्यमंत्री निवडण्यापासून सगळे निर्णय घेते. त्यामुळे भाजपच्या ताकदवर समितीत फडणवीसांची एंट्री झाली तर ते भाजपात आणखी पावरफुल होण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यतांमुळे फडणवीसांच्या सतत दिल्ली वारी सुरु असल्याची माहिती आहे.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा