AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mirror Technique : कितीही खोदून विचारलं तरी काही नाही सांगतच नाही; मग वापरा ही मिरर टेक्निक

काही लोक असे असतात की त्यांना किती प्रश्न विचारले तर इथे मनातील गोष्ट सांगत नाही विशेषतः मुलांना शाळेत काय घडलं मित्रांसोबत काय झालं? आणि काही त्रास आहे का? असा विचारलं की त्यांचं ठरलेलं उत्तर असतं, काही नाही, मग अशावेळी काय करायचं तरी काय? असा प्रश्न पडतो, आता उत्तर सापडलंय

Mirror Technique :  कितीही खोदून विचारलं तरी काही नाही सांगतच नाही; मग वापरा ही मिरर टेक्निक
| Updated on: Nov 22, 2026 | 9:32 PM
Share

काही लोक असे असतात की त्यांना किती प्रश्न विचारले तर इथे मनातील गोष्ट सांगत नाही विशेषतः मुलांना शाळेत काय घडलं मित्रांसोबत काय झालं? आणि काही त्रास आहे का? असा विचारलं की त्यांचं ठरलेलं उत्तर असतं, काही नाही, मग अशावेळी काय करायचं तरी काय? सतत प्रश्न विचारण्याऐवजी एक छोटीशी संवादाची पद्धत वापरून पहा. तिला ‘मिरर टेक्निक’ असं म्हणतात. या पद्धतीमुळे समोरच्या व्यक्तीला मोकळेपणा , बोलण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकत. विशेष म्हणजे ही पद्धत मुलांशी संवाद साधताना तसेच कामाच्या ठिकाणी योग्य पडू शकते.

काय आहे मिरर टेक्निक

मिरर टेक्निक म्हणजे, समोरची व्यक्ती बोलताना तिच्या वाक्यातल्या शेवटच्या काही महत्त्वाचे शब्द किंवा एखादा ठळक मुद्दा शांतपणे पुन्हा बोलून त्यामध्ये समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या शेवटचे दोन तीन शब्द किंवा महत्त्वाचे शब्द निवडायचे, आणि प्रश्न विचारण्याऐवजी तेच शब्द पुन्हा पुन्हा उच्चाराचे त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपलं बोलणं ऐकलं जात आहे असं जाणवतं. ती अधिक माहिती सांगू लागते.

मुलांशी बोलताना कशी वापराल ही पद्धत?

मुलांना दिवसभरात काय घडलं हे विचारलं की अनेकदा ती फारसं काही सांगत नाहीत. शाळेत काय झालं,मित्रांशी भांडण झालं का, शिक्षकांनी काही सांगितलं का? असे प्रश्न विचारले तरी उत्तर मिळेलंच असं नाही. अशा वेळी मुलांवर प्रश्नांचा भडिमार करण्याऐवजी त्यांच्याशी सहज गप्पा मारायला सुरूवात करा.

उदा. मूल म्हणालं, ‘आज शाळेत माझी मैत्रीण माझ्याशी बोलली नाही, तर लगेच कारण विचारण्याऐवजी मैत्रीण बोलली नाही असं शांतपणे म्हणा. त्यानंतर मूल स्वत:हून काय घडलं, त्याला कसं वाटलं किंवा मैत्रीणीने असं का केलं. हे सांगू शकत. अशा प्रकारे मुलांना स्वत:च्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी मिळते.

मिरर टेक्निक वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

ही पद्धत वापरताना समोरच्या व्यक्तीचे शब्द केवळ पोपटासारखे पुन्हा पुन्हा बोलू नका. तर आवाज शांत ठेवा.चेहऱ्यावर सहज भाव ठेवा आणि समोरच्या व्यक्तीला बोलावण्यासाठी पुरेसा वेळ द्या. वारंवार शब्दांची पुनरावृत्ती केल्यास समोरच्याला कृत्रिम किंवा विचित्र वाटू शकते. त्यामुळे योग्य वेळी आणि सहजपणे ही पद्धत वापरणे महत्त्वाचे आहे.

मिरर टेक्निक म्हणजे कोणाच्या मनातील गुपीत जबरदस्तीने बाहेर काढण्याची युक्ती नाही. तर समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून तिला अधिक मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची एक संवादपद्धत आहे

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!