AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाला केबिनबाहेर हुसकावले… पण तो आत आलाच नि डॉक्टरवर केला हल्ला, कल्याणमध्ये घडलं काय?

Kalyan Crime News: कल्याणमध्ये डॉक्टराला माराहण केल्याची माहिती समोर येत आहे. भानुज्योत हॉस्पिटलच्या डॉक्टराला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कोळसेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुलाला केबिनबाहेर हुसकावले... पण तो आत आलाच नि डॉक्टरवर केला हल्ला, कल्याणमध्ये घडलं काय?
कल्याणमध्ये डॉक्टरला पुन्हा मारहाणImage Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Aug 23, 2026 | 5:51 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर मारहाणीच्या घटनांनी कल्याण हादरले आहे. नगरसेवकांपासून ते रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रमेश म्हात्रेने केलेली मारहाणीची घटना ताजी असताना अजून असाच एक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेत डॉक्टरला रुग्णाच्या मुलाकडून मारहाण करण्यात आली. शास्त्रीनगरनंतर पुन्हा डॉक्टरांवरील हल्ल्याने वैद्यकीय क्षेत्रात संताप केल्या जात आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजारपणाविषयी माहिती देत असतानाच मुलगा डॉक्टरांवर संतापला आणि थोड्या वेळाने केबिनमध्ये येत त्याने ही मारहाण केली.

आजारपणाबद्दल माहिती, डॉक्टरांना मारहाण

कल्याण पूर्वेतील भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना रुग्णाच्या मुलाकडून मारहाण करण्यात आली. रुग्णाच्या आजाराबाबत समजावत असताना आणि रुग्णाला औषध कसे द्यायचे सांगताना मुलगा विनीत देशमुख डॉक्टरांच्या केबिनमध्ये संतापला. ‘तू’ म्हणून का बोलतोस, असे विचारताच रुग्णाच्या मुलाचा संताप अनावर झाला.  रुग्णाने मुलाला केबिनबाहेर जाण्यास सांगितले. मात्र काही वेळाने पुन्हा केबिनमध्ये येत त्याने डॉक्टरांना मारहाण केली.  ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.   भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात येत असल्याचे या प्रकारावरून समोर येत आहे. यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

मारहाणीच्या याप्रकारानंतर संबंधित तरुणाविरोधात कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाणीची घटना ताजी असतानाच पुन्हा डॉक्टरांवर हल्ला झाला. आरोपीला अद्यापही अटक न झाल्याने  डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची वैद्यकीय क्षेत्रातून मागणी करण्यात येत आहे.

दुसर्‍या एका प्रकरणात डॉक्टरविरोधात गुन्हा

प्रेमसंबंधातून एका तरुणीवर धर्मांतरासाठी आणि निकाह करण्यासाठी दबाव आणल्याच्या गंभीर आरोपात एका डॉक्टरविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी आणि आरोपीची 2020 पासून ओळख होती. कामाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली होती. त्याचा गैरफायदा घेत त्याने लैंगिक संबंधांसाठी दबाव आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान 16 ऑगस्ट 2025 रोजी काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेऊन तिने दुसरा धर्म स्वीकारल्याचे तिला सांगण्यात आले. पण इतर धर्म स्वीकारण्यास तिने नकार दिल्यावर तिला धमकी देण्यात आली. संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...