AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाय बांधले, डोक्यावर वार..बॉयफ्रेंडच्या बाथरुममध्ये सापडला विद्यार्थिनीचा मृतदेह; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ

वाराणसीतील नीट आणि एमएससी विद्यार्थिनीच्या नृशंस हत्येमुळे शहर हादरले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार गळा चिरून हत्या, डोक्याला गंभीर इजा आणि लैंगिक अत्याचाराची शक्यता समोर आली आहे. पोलिसांनी चार पथके नेमली असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी कसून तपास सुरू आहे.

पाय बांधले, डोक्यावर वार..बॉयफ्रेंडच्या बाथरुममध्ये सापडला विद्यार्थिनीचा मृतदेह; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
| Updated on: Aug 24, 2026 | 10:18 PM
Share

नीटची तयारी करणाऱ्या आणि एमएससी (Msc) चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या नृशंस हत्येमुळे अख्खं वाराणसी हादरलं. या हत्याप्रकरणाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून जे भयानक सत्य समोर आलं, त्याने तर मोठी खळबळ उडाली. त्या विद्यार्निथीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची अधिकृत पुष्टी पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून झाली आहे. एवढंच नव्हे तर तिच्या डोक्यावर जड वस्तूने मारण्यात आलं होतं, तिचे पायही बांधून ठेवण्यात आले होते. मृत्यूपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे, मात्र शास्त्रीयदृष्ट्या त्याची पुष्टी करण्यासाठी डॉक्टरांच्या पथकाने नमुने, फॉरेन्सिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवलेत.

पोस्टमॉर्टम अहवालातील या महत्त्वपूर्ण खुलाशानंतर पोलिसांनी हत्या आणि संभाव्य लैंगिक अत्याचाराच्या कलमांनुसार तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विवेक चौबे याला पकडण्यासाठी चार पथकं स्थापन करण्यात आली असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. चुनार, नियारडीह आणि चोलापूरसह आठ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात आहे.

दुसरीकडे लग्न ठरल्याने संतापला आरोपी

मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, आरोपी विवेक चौबे हा गेल्या काही काळापासून मुलीला ब्लॅकमेल करत होता. त्याने तिचा लग्नाच्या पोशाखातील फोटो काढून तो एडिट केला होता आणि दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस तर तो व्हायरल करेन अशी धमकी त्याने दिली होती.  त्या मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या इसमाशी ठरवलं होतं, फेब्रुवारी महिन्यात त्यांचा विवाह होणार होता, मात्र हे समजताच आरोपी प्रचंड संतापला. नीट परीक्षेच्या तयारीसाठी मदत करतो असं आमिष दाखवून आरोपीने त्या विद्यार्थीनीला 18 ऑगस्ट रोजी आपल्या भाड्याच्या खोलीवर बोलावलं. याच ठिकाणी तिची निर्घृण हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

बाथरूममध्ये आढळला मृतदेह

18 ऑगस्टला मृत विद्यार्थीनी घरातून बाहेर पडली, पण उशीर होऊनहीआलीच नाही, यामुळे घरचे काळजीत पडले. तिच्याशी बराच काळ संपर्कही होऊ शकला नाही, त्यामुळे काही वाईट-साईट घडलं नाही ना अशी शंका त्यांना आली. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या घटनेची दखल घेत पोलिसांनी  तपासाचाचा वेग वाढवत बच्छाव येथील आरोपीच्या भाड्याच्या खोलीचा शोध घेतला. मात्र ती खोली उघडल्यानंतर बाथरूममध्ये त्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्याने सगळेच हादरले. तिचा गळा चिरलेला होता, तर पाय बांधलेल्या अवस्थेत होते.

विशेष म्हणजे, ज्या घरात ही दुर्दैवी घटना घडली, त्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वर बसवण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेराही खराब असल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी त्या विद्यार्थिनीचा लॅपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतला असून त्यातून काही क्लू मिळतो का हे तपासून पाहण्यात येणार आहे. मुलीच्या जाण्याने कोलमडून पडलेल्या कुटुंबियांनी साश्रूनयनांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. फरार आरोपीला लौकरात लौकर पकडून कठोर शिक्षा देऊ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु