AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे हादरलं! 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, पांढरी पावडर देऊन…हॉटेलमध्ये डांबून अत्याचार केल्याने खळबळ!

चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून या २२ वर्षीय तरुणीला लॉजमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा. ती परप्रांतीय असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे हादरलं! 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, पांढरी पावडर देऊन...हॉटेलमध्ये डांबून अत्याचार केल्याने खळबळ!
pune shirur newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 22, 2026 | 10:48 PM
Share

आपलं करिअर घडवण्यासाठी आज मुली घराबाहेर पडत आहेत. अशीच एक 22 वर्षीय तरुणी चांगल्या पगाराच्या शोधात असताना वचित्र अशा जाळ्यात फसली. त्यानंतर तिच्यावर एका लॉजमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आलाय. पांढऱ्या रंगाचे पाडवर देऊन तिच्यावर हे क्रूर कृत्य करण्यात आले. ही घटना समोर येताच महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार एका  २२ वर्षीय तरुणीला चांगल्या पगाराचे काम मिळवून देतो, असे सांगून आरोपींनी तिला कारमधून शिरूर येथे आणले. १९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या दोन दिवसांच्या कालावधीत शिरूर गावच्या हद्दीतील ‘हॉटेल मार्वल इन लॉजिंग’ येथील खोलीमध्ये  तरुणीला डांबून ठेवण्यात आले. तिथे तिला बळजबरीने नशा येणारी पांढरी पावडर खायला देऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

घटना नेमकी कुठली आहे?

पुण्यातील शिरूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी  संतापजनक घटना घडली आली आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून या २२ वर्षीय तरुणीला लॉजमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा. ती परप्रांतीय असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडीत तरुणी पुणे जिल्ह्यात कामानिमित्त आली होती. ती मूळची छत्तीसगड येथील आहे. या नरक यातनेतून सुटका झाल्यानंतर पीडित तरुणीने शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर मांडला. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Follow Us
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र