Titanic Wreckage: 114 वर्षे उलटूनही टायटॅनिकचे अवशेष अजूनही समुद्रतळाशी का पडून आहेत? जाणून घ्या कारण
1912 सालापासून टायटॅनिक समुद्राच्या तळाशी पडून आहे. आजवर ते बाहेर का काढले गेले नाही, यामागचे कारण काय आहे ते जाणून घ्या.

Titanic Wreckage: इसका मलबा समुद्र की सतह से लगभग 12500 फीट नीचे मौजूद है. यहां इसे 1985 में खोजा गया था. इसका खराब होता ढांचा, नाजुक बनावट, इसे सुरक्षित रखने की चुनौती और अंतरराष्ट्रीय सुरक्षा नियम इसके डूबे रहने की वजह हैं. 15 एप्रिल 1912 रोजी उत्तर अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाज बुडाले. हे अगदीच सगळ्यांना माहित आहे. ज्यामध्ये 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्या दिवसापासून या जहाजाचे अवशेष समुद्रपृष्ठापासून सुमारे 12500 फूट खाली आहेत. हे अवशेष जिथे ते 1985 मध्ये शोधून काढण्यात आले. पण हे अवशेष अजूनही पाण्यातच आहेत. त्यांना बाहेर काढलेलं नाही. जहाजाची ढासळत चाललेली रचना, त्याची अत्यंत नाजूक स्थिती, जतन करण्यामधील आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियम यांसारख्या कारणांमुळे हे अवशेष आजही त्याच ठिकाणी पडून आहेत, जिथे जहाज बुडाले होते.
12,500 फूट खोलीमुळे, बाहेर काढणे कठीण
टायटॅनिक जहाज समुद्रपृष्ठापासून सुमारे 12,500 फूट खोल खाली आहे. इतक्या खोलीवर पाण्याचा दाब पृष्ठभागाच्या तुलनेत सुमारे 380 पटीने अधिक, म्हणजेच साधारण 5,500 ते 6,000 पीएसआय (PSI) इतका असू शकतो. अशा परिस्थितीत सामान्य उपकरणे काम करू शकत नाहीत. त्यामुळे, विशेष खोल-समुद्री पाणबुड्या आणि रिमोटद्वारे चालणारी वाहने (ROVs) वापरणे आवश्यक असते. एवढ्या अवाढव्य अवशेषांना बाहेर काढण्यासाठी तिला घट्ट पकडून वर उचलण्यास सक्षम अशा उपकरणांची गरज पडेल. मात्र, दाबामध्ये होणारे बदल आणि जहाजाची सध्याची अत्यंत नाजूक अवस्था यामुळे त्याला अधिक नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे.
बॅक्टेरियामुळे टायटॅनिकला धोका
समुद्राचे पाणी, रासायनिक प्रक्रिया आणि सूक्ष्मजीवांमुळे टायटॅनिकचे लोखंड हळूहळू नष्ट होत आहे. 2010 मध्ये शास्त्रज्ञांना जहाजाच्या गंजलेल्या भागात हॅलोमोनास टायटॅनिके नावाचा बॅक्टेरिया आढळला. यामुळे लोखंडाला गंज लागण्याची प्रक्रिया वेगाने होते. त्यामुळे जहाजावर गंजाच्या बर्फासारख्या रचना तयार झाल्या आहेत.
जहाजाचे दोन तुकडे
बुडताना टायटॅनिकचे दोन मोठे तुकडे झाले. त्याचा पुढचा आणि मागचा भाग समुद्राच्या तळाशी सुमारे 2,000 फूट अंतरावर पडले आहेत. दोन्ही भाग अत्यंत कमकुवत झाले असल्याने त्यांना बाहेर काढणे कठीण आहे.
जहाज बाहेर काढणे कठीण
114 वर्षांहून अधिक काळ समुद्रात असल्यामुळे टायटॅनिकचे लोखंड कमकुवत झाले आहे. ते बाहेर काढताना तुटण्याची शक्यता आहे. तसेच हवेशी संपर्क आल्यावर गंज रोखण्यासाठी विशेष वैज्ञानिक प्रक्रिया करावी लागेल.
टायटॅनिकच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न
2012 मध्ये टायटॅनिकचा समावेश UNESCO च्या समुद्राखालील सांस्कृतिक वारसा संरक्षणाच्या करारांतर्गत झाला. या कराराचा उद्देश जहाजाचे संरक्षण करणे आणि त्यातील वस्तूंची लूट किंवा व्यावसायिक वापर रोखणे हा आहे. अमेरिका आणि ब्रिटननेही त्याच्या संरक्षणासाठी नियम लागू केले आहेत.
