AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेलिब्रेशन असावे तर असे! ना उडी मारली, ना कसला दिखावा, ध्रुव जुरेलने बायसेपवरील टॅटू दाखवला, Video Viral

Dhruv Jurel Celebration Video: उजव्या हाताचा फलंदाज ध्रुव जुरेलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. या शतकी खेळीची जितकी चर्चा झाली नाही तितकी चर्चा ही ध्रुव जुरेलने केलेल्या सेलिब्रेशनची रंगली. ध्रुव जुरेलच्या सेलिब्रेशनने सगळ्यांचे लक्षवेधून घेतले.

सेलिब्रेशन असावे तर असे! ना उडी मारली, ना कसला दिखावा, ध्रुव जुरेलने बायसेपवरील टॅटू दाखवला, Video Viral
| Updated on: Aug 24, 2026 | 6:30 PM
Share

IND vs SL Test Series: उजव्या हाताचा फलंदाज ध्रुव जुरेलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने हा टप्पा गाठला. दिवसाच्या शेवटच्या सत्रात वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर त्याने आपले पूर्ण शतक केले. या शतकी खेळीची जितकी चर्चा झाली नाही तितकी चर्चा ही ध्रुव जुरेलने केलेल्या सेलिब्रेशनची रंगली. ध्रुव जुरेलच्या सेलिब्रेशनने सगळ्यांचे लक्षवेधून घेतले.

ध्रुव जुरेलचे वडील, यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात भारतासाठी पाकिस्तानविरुद्ध भाग घेतला होता. नंतर त्यांनी सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. आपल्या सैनिक वडिलांसाठी अनेकदा मैदानावर आपल्या बॅटचे बंदुकीत रूपांतर करून सलामी देत ​​असे. पण यावेळी, त्याने थोडे हटके सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनची विशेष चर्चा रंगली. त्याने या वेळेला सेलिब्रेशन केल्यानंतर बंदुकीचे सेलिब्रेशन न करता थेट आपला दंड दाखवला. त्याने त्याच्या दंडावर ‘जय जवान, जय किसान’चा टॅटू गोंदवला असल्याचे पाहायला मिळाले. आता त्याने शतकी खेळीनंतर ‘जय जवान, जय किसान’ चा टॅटू दाखवत पुन्हा एकदा त्याचे राष्ट्रप्रतीचे प्रेम आणि सैन्याबद्दलचा आदर दर्शवला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

श्रीलंकेत सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी शतक झळकावणारा ध्रुव जुरेल हा दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम करणारा एकमेव भारतीय खेळाडू हार्दिक पांड्या होता (१०८ धावा, पल्लेकेले २०१७). तसेच, डिसेंबर २०२४ मध्ये मेलबर्न येथे नितीश कुमार रेड्डी (११४ धावा) यांच्यानंतर, भारतासाठी सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर शतक झळकावणारा जुरेल हा पहिला फलंदाज ठरला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात देवदत्त पडिकलने शतकी खेळी खेळली. यानंतर दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावातही त्याने आपले शतक पूर्ण केले. आता पहिली कसोटी भारतीय संघाने जिंकली आता दुसरी कसोटीही भारतीय संघाने जिंकली तर मालिका जिंकण्यात यश मिळेल.

Follow Us
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी