AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सध्या मिस यूनिवर्स इंडिया 2026 मध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
| Updated on: Aug 24, 2026 | 7:28 PM
Share

मिस युनिव्हर्स इंडिया 2026 च्या विजेतेपदाचा मान केरळच्या केजिया लिज मेजो हिने पटकावला आहे. आता ती 75 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेच्या परीक्षक मंडळात माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन, उर्वशी रौतेला आणि सेलिना जेटली यांचा समावेश होता.

या स्पर्धेदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने विशेष लक्ष वेधून घेतले. तिने तिरंग्याच्या रंगांपासून प्रेरणा घेतलेला ऑफ-शोल्डर गाउन परिधान केला होता. या गाउनमध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा रंग असून मध्यभागी अशोकचक्राची प्रतिकृती होती. तिच्या या पोशाखावरून सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. त्यासोबतच या कार्यक्रमातील तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे.

तिच्या या व्हिडीओवर काही युजर्सनी उर्वशीच्या ड्रेसवर आक्षेप घेत हा पोशाख भारतीय ध्वज संहितेच्या नियमांशी संबंधित असल्याचे म्हटले. तिरंग्याचा पोशाख, ड्रेस किंवा युनिफॉर्म म्हणून वापर करण्याबाबत कायद्यात निर्बंध असल्याचेही काहींनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे उर्वशीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून हा तिरंग्याचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, उर्वशीने सुष्मिता सेन यांना आपला पहिला गुरु असल्याचे सांगितले. सुष्मिता यांनीच तिला मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेचा मुकुट प्रदान केला होता. त्यामुळे दोघींमधील हा खास संबंधही कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरला.

तिरंग्याच्या वापराबाबत कायदा काय सांगतो?

राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम, 1971 अंतर्गत राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करणे दंडनीय आहे. कायद्यानुसार तिरंग्याचा वापर कपडे, ड्रेस किंवा युनिफॉर्म म्हणून करणे तसेच काही विशिष्ट वस्तूंवर त्याची प्रतिकृती वापरण्यावर निर्बंध आहेत. जाणूनबुजून राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

मात्र, उर्वशी रौतेलाच्या गाउनने प्रत्यक्षात कायद्याचे उल्लंघन केले आहे की नाही, हे संबंधित कायदेशीर तरतुदी आणि पोशाखाच्या स्वरूपावर अवलंबून ठरते. सोशल मीडियावरील टीका ही स्वतःहून कायदेशीर निष्कर्ष ठरत नाही.

Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...