AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्षाबंधनाला बहिणीला कोणते खास गिफ्ट? Coin, Jewellery वा Digital Gold? हा पर्याय एकदम स्मार्ट

Raksha Bandhan Gold Gift: रक्षाबंधनाला लाडक्या ताईसाठी, दीदीसाठी, बहिणीसाठी जर एकदम खास गिफ्ट देण्याच्या विचारात असाल तर स्मार्ट पर्याय निवडा. तिला हे गिफ्ट गुंतवणुकीचा पर्याय असायला हवा. दागिने, नाणे आणि डिजिटल गोल्डपैकी कोणता पर्याय चांगला असेल?

रक्षाबंधनाला बहिणीला कोणते खास गिफ्ट? Coin, Jewellery वा Digital Gold? हा पर्याय एकदम स्मार्ट
रक्षा बंधन
| Updated on: Aug 24, 2026 | 6:47 PM
Share

रक्षाबंधनाचा सण अगदी जवळ आला आहे. अनेक भावांनी लाडक्या ताई, दीदीला, छोट्या बहिणीसाठी गिफ्ट खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. काहींनी बहिणीसाठी दीर्घकालीन फायदा होईल अशी भेट देण्याची तयारी सुरू केली आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रक्षाबंधनासाठी तुम्ही सोन्याचे दागिने (Gold Jewellery), नाणे (gold coins) वा डिजिटल गोल्ड (digital gold) या तीन पर्यायांपैकी एकाची निवड केल्यास हे गिफ्ट स्मरणात राहील.

1. सोन्याची दागिने

सोन्याचा भाव जरी उंचावला असला तरी आजही सोन्याच्या बांगड्या, कानातील अथवा दुसरा एखादा दागिना गिफ्ट म्हणून देता येईल. दागिने तयार करण्यासाठी मेकिंग चार्ज आकारला जातो. जेव्हा सोन्याची वस्तू मोडण्यासाठी दिली जाते तेव्हा मात्र मेकिंग चार्जची रक्कम कापून उर्वरीत रक्कम हाती देण्यात येते. हा फरक जवळपास 10 ते 25 टक्क्यांपर्यंत असू शकतो. तर घरात सोने ठेवण्याची जोखीम आणि हरवण्याची भीती असते.

2. सोन्याचे नाणे

बहिणीला गिफ्ट देण्यासाठी सोन्याचे नाणे हा एक चांगला पर्याय ठरतो. यामध्ये 24 कॅरेटची हमी असते. दागिन्यांच्या तुलनेत यासाठी मेकिंग चार्जेसही कमी लागतात. सोन्याचे नाणे सुद्धा जपून ठेवणे जिकरीचे काम आहे. घरातील तिजोरीत ते सुरक्षित असते. पण जोखीम कमी होत नाही. हरवण्याची भीती कमी होत नाही. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्यास शुल्क भरावे लागते.

3. डिजिटल गोल्ड

सध्या डिजिटल गोल्डचा ट्रेंड आहे. फिजिकल गोल्डपेक्षा, डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक वाढली आहे. विशेष म्हणजे केवळ 10 रुपयांपासून सोने खरेदी करता येते. यामध्ये कोणताही मेकिंग चार्ज लागत नाही. या गुंतवणुकीत 99.9% शुद्ध 24 कॅरेट सोने मिळते. Googlepay, phone pay, Paytm आणि इतर अनेक डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही सहज डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. हे सोने तुम्हाला घरपोच मिळते. हवं तर ते ऑनलाईन विक्री सुद्धा करता येते.

डिस्क्लेमर: टीव्ही 9 मराठी गुंतवणुकीचा कोणताही सल्ला देत नाही. गुंतवणुकीपूर्वी तुमच्या अर्थतज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ