
आम्ही बोलतोय नेपाळी सिनेमाचा सुपरस्टार राजेश हमाल यांच्याबद्दल. 9 जून 1964 रोजी पल्पा, नेपाळमध्ये राजेश यांचा जन्म झाला. त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली. राजेश यांनी तीन दशकापेक्षा जास्त काळात 300 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं.

राजेश यांचे वडील चुड़ा बहादुर हमाल एक प्रमुख डिप्लोमॅट होते. नेपाळचे पाकिस्तानातील राजदूत म्हणून त्यांनी काम केलय. राजेश यांना नेपाळी सिनेमाच महानायक म्हटलं जातं. हमाल यांच्या करिअरची 1991 साली सुरुवात झाली. 1990 आणि 2000 च्या दशकात नेपाळमध्ये त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.

त्यांनी नेपाळी सिनेमात अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवले. यात लीड एक्टर म्हणून व्यावसायिकरित्या जास्त यशस्वी चित्रपट दिले. सर्वात जास्त हिट आणि सर्वात जास्त एक्टिंग अवॉर्ड यात आहेत.

हमाल यांनी आपले काका दीपक रायमाझी यांची फिल्म 'युग देखी युग सम्मा' (1991) मधून अभिनयाची सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरावर त्यांना ओळख मिळाली. 2019 मध्ये त्यांनी 'हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेयर?' च्या नेपाळी वर्जन- 'को बांचा करोड़पती' होस्ट केला.

शो ला होस्ट केल्यामुळे राजेशची तुलना बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाते. किशोरावस्थेत हमाल वडिलांसोबत मॉस्को येथे निघून गेलेले. अनेक वर्ष रशियात राहिले. तिथल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. त्यांनी दिल्ली विश्वविद्यालयातून इंग्रजी साहित्यात एम.ए.ची डिग्री घेतली.हमाल यांची नेटवर्थ 50 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 441 कोटीची संपत्ती आहे.