‘ग्लोरी’वेब सीरिजमधील ‘भारती भाभी’ कोण? Netflix वर येताच तिच्या हॉट लुकने घातलाय धुमाकूळ
कोण आहे 'ग्लोरी' वेब सीरिजमधील चर्चेत आलेली 'भारती भाभी'? Netflix वर येताच तिच्या हॉट लुकची सोशल मीडियावर रंगली चर्चा. फोटो पाहून सर्वच हैराण.

ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘ग्लोरी’ या वेब सीरिजची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. पुलकित सम्राट आणि दिव्येंदू शर्माच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये ‘भारती भाभी’च्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री कश्मिरा परदेशी विशेष लक्ष वेधून घेत आहे.

3 नोव्हेंबर 1997 रोजी जन्मलेली कश्मीरा परदेशी मूळची पुणे येथील आहे तर सध्या ती मुंबईमध्ये राहते. तिचं शिक्षण पुण्यातील सेंट अॅनीज हायस्कूलमध्ये झालं असून तिने National Institute of Fashion Technology मुंबई येथून फॅशन डिझाइनिंगचं शिक्षण घेतलं आहे.

कश्मीराने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या नर्तनसाला या साऊथ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने प्रामुख्याने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. यानंतर अक्षय कुमारच्या Mission Mangal या चित्रपटातून तिने हिंदी सिनेमात एन्ट्री घेतली.

‘ग्लोरी’ या वेब सीरिजमध्ये कश्मीरा परदेशी ‘भारती’ या महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ती हरियाणा पोलिस इन्स्पेक्टर अरविंद यांच्या पत्नीची भूमिका साकारते. कथानक जसजसं पुढे सरकतं, तसतसा तिचा कॅरेक्टर अधिक प्रभावी होताना दिसतो.

या सीरिजमधील तिच्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस लुक्सचीही जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओंना मोठी पसंती मिळत असून, तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.