Netflix च्या ग्राहकांना झटका, सब्सक्रिप्शनच्या किमतीत मोठी वाढ, वाचा…
Netflix Subscription Price Hike : Netflix च्या ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी आहे. कंपनीने आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता वाढीव पैसे मोजावे लागणार आहेत.

Netflix ने पुन्हा एकदा आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे OTT स्ट्रीमिंगसाठी सतत नेटफ्लिक्सचा वापर करणाऱ्या युजर्सना मोठा धक्का बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार नेटफ्लिक्सने अमेरिकेत आपल्या प्लॅनचे दर वाढवले आहेत. पण येत्या काही दिवसांत इतर देशांमध्येही याचा परिणाम दिसू शकतो. मात्र, याबाबत कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नेटफ्लिक्सच्या या निर्णयचा कोट्यवधी युजर्सवर मोठा परिणाम होणार आहे. कारण नेटफ्लिक्सकडून करण्यात आलेली ही यंदाची दुसरी दरवाढ आहे. याआधी जानेवारी महिन्यातही कंपनीने सबस्क्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या होत्या.

नेटफ्लिक्सच्या नवीन दरांनुसार, अॅड-सपोर्टेड प्लॅनची किंमत 7.99 डॉलरवरून 8.99 डॉलर झाली आहे. स्टँडर्ड प्लॅन 17.99 डॉलरवरून 19.99 डॉलर झाला आहे. प्रीमियम प्लॅन 24.99 डॉलरवरून 26.99 डॉलर झाला आहे.

त्याचबरोबर अॅड-सपोर्टेड अॅड-ऑनची किंमत 5.99 डॉलरवरून 6.99 डॉलर झाली आहे. अॅड-फ्री अॅड-ऑनची किंमत 8.99 डॉलरवरून 9.99 डॉलर झाली आहे. या किमती आगामी काळात भारतासह इतरही देशांमध्ये लागू होण्याची शक्यता आहे.