
अभिनेत्री राजश्री देशपांडे अलीकडेच 'रंगीन' वेब सीरीजमध्ये दिसली. तिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये कधी लीड अभिनेत्रीचा रोल केलेला नाही. नेहमीच सपोर्टिंग रोल्समध्ये ती दिसली आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत राजश्री देशपांडे तिच्या इंडस्ट्रीतल्या प्रवासाबद्दल व्यक्त झाली. इथपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रवास सोपा नव्हता. मी हे त्या लोकांसाठी बोलतेय, जे मला कमी समजत होते.

राजश्री Instant Bollywood सोबत बोलताना म्हणाली की, आज जर मी फिल्मफेअर पुरस्कार घेतला किंवा आज या ठिकाणी मी बसलीय, तर मी तुम्हाला सांगीन की, असं अनेक लोक मला बोलले की, तू काही करु शकत नाहीस.

खूप लोक माझ्याशी मला वाईट वाटेल असं वागले. ते मला म्हणायचे तुझ्या ती गोष्ट नाही, ना तुझ्याकडे उंची आहे, ना सौंदर्य. तू सडपातळ नाहीस. तुला काही येत नाही. तुझ्याकडे पैसा नाही, कॉन्टॅक्ट्स नाही असं राजश्री म्हणाली.

राजश्रीने वर्ष 2012 मध्ये आमिर खानच्या तलाश चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. आज ओटीटी विश्वात ती चांगल नाव कमावतेय. 43 वर्षाच्या राजश्रीने नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत 'सेक्रेड गेम्स' वेब सीरीजमध्ये इंटीनमेट सीन्स दिले होते. त्यामुळे ती चर्चेत आली.