
शेअर बाजारात पडझडीचे सत्र असले तरी या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. या शेअरची सर्वत्र चर्चा आहे. नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजी (Network People Services Technologies) कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. त्यांना जणू लॉटरीच लागली आहे. त्याची गरिबी एका झटक्यात दूर झाली आहे. तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा लाभ झाला आहे.

हा शेअर 2022 मध्ये 21.85 रुपयांवर ट्रेड करता होता. त्यानंतर या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली. हा शेअर थेट 1400 रुपयांवर पोहचला. त्याही पुढे त्याची आगेकूच दिसून आली. त्यामुळे ज्यांनी त्यावेळी मोठी गुंतवणूक केली ते मालामाल झाले. या शेअरमुळे अवघ्या तीन वर्षातच गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

पण गेल्या चार वर्षात या कंपनीने शेअर बाजारात रॉकेट झेप घेतल्यानंतर गेल्या वर्षी मात्र अत्यंत खराब कामगिरी नोंदवली. गेल्या वर्षी 2025 मध्ये या शेअरमध्ये 47 टक्क्यांची सर्वात मोठी पडझड दिसून आली. हा शेअर अर्ध्या किंमतीच्या जवळपास येऊन आपटला. असे असले तरी ज्यांनी सुरुवातीलाच या कंपनीत गुंतवणूक केली. ते आजही फायद्यात आहेत.

जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2024 हा या कंपनीचा सर्वात तेजीचा काळ होता. या काळात कंपनीचा शेअर 16,270 टक्क्यांनी वधारला. एकेकाळी हा शेअर 3,577 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला होता. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी त्यावेळी योग्यवेळी एक्झिट घेत कमाई करुन घेतली. आताही या शेअरकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

काल 14 जानेवारी रोजी बाजार बंदवेळी Network People Services Technologies चा शेअर 1,308 रुपयांवर होता. या आठवड्यातील पाच दिवसात त्यामध्ये 101.50 अंकांची घसरण दिसून आली. एका महिन्यात हा शेअर 11.45 टक्क्यांनी घसरला. गेल्या सहा महिन्याचा विचार करता या शेअरमध्ये 32.52 टक्क्यांची पडझड झाली.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.