
पालक ही एक अत्यंत पौष्टिक हिरवी भाजी आहे. मात्र, पालकाचे सेवन कधाही कच्चे करू नये. कारण त्यामध्ये बग्स आणि बॅक्टेरिया असू शकतात. जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.

गाजर एक कंदमुळ आहे. त्यात विषारी घटक आणि बॅक्टेरिया असतात. हे साफ न करता आणि कच्चे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

बटाट्यांचा वापर बऱ्याच भाज्यामध्ये केला जातो. मात्र, बटाट्यामध्ये सोलानिस नावाचा एक विषारी घटक आढळतो. यामुळे त्याचे कच्चे सेवन केल्यास पाचन तंत्राशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

मशरूम शिजवलेले किंवा भाजलेले खावेत. मशरूममध्ये जास्त पोटॅशियम असते. यामुळे कधीही मशरूम कच्चे खाऊ नका.

आल्याचा वापर बहुधा चहामध्ये होतो. सर्दी, खोकला आणि घशात दुखल्यावर अनेकजण कच्चे आले खातात. मात्र, तज्ञांच्या मते कच्च्या आल्याऐवजी ते शिजवून खावे. (टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)