
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर ते थेट मंत्रालयात गेले. तेथे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचे स्वागत केले. महिला कर्मचाऱ्यांनी या तिघांचे औक्षण केले.

नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात प्रवेश करताच दालनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसबिरीसमोर नतमस्तक होत आशीर्वाद मागितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा यांनी देखील यावेळी महापुरुषांना वंदन केले.

शपथविधी झाल्यानंतर लागलीच नवेनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी रात्री पहीलीच कॅबिनट घेत वैद्यकीय विभागाच्या फाईलवर सही केली.

शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयात गेले तेथे विधीमंडळ वार्ताहर संघाने देखील त्यांचे स्वागत करीत अभिनंदन केले.

शपथविधी सोहळ्याला अनेक राज्याचे मुख्यमंत्री आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी एनडीएचे घटक पक्ष असलेल्या टीडीपीचे नेते आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे स्वागत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

शपथविधी सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, त्यावेळी छायाचित्रात देवेंद्र फ़डणवीस आणि एकनाथ शिंदे दिसत आहेत.

अजितदादांनी आता सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला आहे. शपथविधी झाल्यानंतर मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीला अभिवादन केले.

अनेक दिवस रुसून बसलेल्या एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री या नात्याने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.

निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी अचानक गावी जाऊन आराम केल्यानंतर ते आजारी पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. नंतर त्यांनी ठाण्यात येत पत्रकार परिषदे घेत आपला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या निर्णयाला पाठींबा असेल असे सांगितले. आज त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले.

अजितदादा यांनी शपथ सोहळ्याच्या पूर्व संध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत कोणी शपथ घेऊ अगर न घेऊ मी तर घेणार बाबा असे वक्तव्य केल्याने हसा पिकला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला सकाळी आणि रात्री शपथ घेण्याची सवय आहे हो असा टोला लगावत कडी केली. अखेर बोलल्या प्रमाणे अजितदादांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.