
राजधानी दिल्लीत मागच्या काही दिवसांपासून ठिकाठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूराची परिस्थिती राजधानी दिल्लीत होती.

आता मात्र दिल्लीच्या काही भागातील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. पाणी पातळीत घट होताना दिसत आहे.

पाणी जरी ओसरत असेल तरी आज दुपारनंतर राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तर तिकडे दिल्लीतील हथिनीकुंड बैराज भागातील पाणी पातळी वाढताना दिसतेय. त्यामुळे याभागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पाणी जरी ओसरत असलं तरी काही भागात गाळ साचलेला दिसतोय. यातून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना प्रश्नसनाकडून देण्यात आल्या आहेत.