दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी FSSAI चा नवा नियम! पॅकेटवरचा ‘हा’ लोगो चेक करायचं ठेवा लक्षात!
FSSAI ने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या लेबलिंग नियमांमध्ये बदल केला आहे. 1 जुलै 2028 पासून दूध, मिल्क प्रोडक्ट्स आणि कंपोझिट मिल्क प्रोडक्ट्सच्या पॅकेजिंगवर विशेष लोगो लावणे अनिवार्य असेल.

FSSAI कडून लेबलिंग नियमांमध्ये बदल: फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या लेबलिंग नियमांमध्ये सुधारणा केली आहे. यानुसार पॅकेजिंगवर ठरावीक लोगो लावणे बंधनकारक असेल.
जुलै 2028 पासून नियम लागू: नवीन नियम 1 जुलै 2028 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे डेअरी कंपन्या आणि संबंधित खाद्य व्यावसायिकांना या तारखेपूर्वी पॅकेजिंग आणि लेबलिंगमध्ये आवश्यक बदल करावे लागतील.
पॅकेटवर विशेष लोगो लावणे अनिवार्य: दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ आणि कंपोझिट मिल्क प्रोडक्ट्सच्या पॅकेटवर निर्धारित लोगो लावावा लागेल. यामुळे ग्राहकांना उत्पादनाची नेमकी श्रेणी ओळखता येईल.
पॅकेटच्या आकारानुसार लोगोचा आकार ठरणार: FSSAI ने पॅकेजिंगच्या मुख्य डिस्प्ले पॅनलच्या (PDP) क्षेत्रफळानुसार लोगोचा किमान आकार निश्चित केला आहे. 100 चौ. सेमीपर्यंत – 6 मिमी, 100 ते 500 चौ. सेमी – 8 मिमी, 500 ते 2500 चौ. सेमी – 12 मिमी, 2500 चौ. सेमीपेक्षा जास्त – 16 मिमी.
ग्राहकांना उत्पादनाची ओळख पटणार: या नियमामुळे ग्राहकांना एखादे उत्पादन दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या श्रेणीत येते की नाही, हे सहज समजणार आहे. तसेच उत्पादनांच्या लेबलिंगमध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.